सध्याच्या सणासुदीच्या काळात सोन्याचे दर प्रचंड (Gold Rate) वाढले आहेत. काही दिवसांत सोने ८० हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात सोन्याला सांस्कृतिक महत्व आहे. त्यामुळे सण उत्सवाच्या प्रसंगी किंवा एखाद्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी केली जाते. फक्त दागिने म्हणूनच नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही भारतात सोने खरेदी केली जाते. अगदी प्राचीन काळापासून ते आजच्या काळातही सोन्याचं महत्व अबाधित आहे. आजही सोन्याचं इतकं महत्त्व का आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग जाणून घेऊ या की सोन्यात गुंतवणूक करणे का महत्त्वाचे आहे आणि याचे फायदे काय आहेत..
Gold Rate प्राचीन काळापासून सोन्याचं महत्त्व
प्राचीन काळापासून सोन्याचं महत्त्व आहे. जुन्या काळीही सोन्यात गुंतवणूक करणे महत्त्वाचे मानले जात होते. ज्यावेळी सोन्याचा शोध लागला आणि माणसांनी व्यवसाय करणे शिकले तेव्हापासून सोने मानवी जीवनातील अविभाज्य घटक बनले आहे. सोन्यासाठी असंख्य युद्ध झाली. साम्राज्य अस्तित्वात आले आणि लयालाही गेले. तरी देखील सोन्याचं महत्त्व कमी झालं नाही. सोने नेहमीच प्रतिष्ठेचे प्रतीक राहिले. राजे रजवाड्यांसाठी खजिना भरण्याचे माध्यम तर सर्वसामान्यांसाठी दागिन्यांचं साधन सोनंच राहिलं. याच कारणामुळे प्राचीन काळी आणि आजही सोन्याची चमक काही कमी झाली नाही. भारतासारख्या देशात सोन्याचे एक खास सांस्कृतिक महत्त्व सुद्धा आहे.
Gold Rate पोर्टफोलिओत विविधता
सोने तुमच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये विविधता आणते. अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या काळात तुमच्या पोर्टफोलिओसाठी सोने रिस्क मॅनेजमेंटचे काम करते. युद्ध किंवा तणावाच्या प्रसंगी शेअर बाजारात घसरण सुरू होते. आर्थिक अनिश्चितता वाढीस लागते. या संकटाच्या काळात सोन्याचं महत्त्व लक्षात येतं. या प्रसंगात सोन्याच्या किमती वाढतात. अशा वेळी शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या नुकसानीची काही प्रमाणात का होईना भरपाई करता येते.
Gold Rate सोन्यावर कर्ज मिळणे सोपे
आर्थिक संकट किंवा अचानक पैशांची गरज असल्यास कर्ज घ्यावे लागते. पण जर तुमच्याकडे सोनं असेल तर तुम्ही सहज (Gold Loan) कर्ज घेऊ शकता. बँक आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFC) सोने तारण कर्जाला सर्वात सुरक्षित कर्ज मानतात. कारण यामध्ये एनपीए (NPA) तयार होण्याची शक्यता खूप कमी असते. कर्जदाराने कर्ज परत केले नाही तर बँका सोने विकून कर्ज वसूल करू शकतात. यामध्ये बँकांना काही नुकसानही होत नाही.
अजितदादांचे स्टार प्रचारक ठरले; मुश्रीफ, तटकरे, मुंडे, भुजबळांवर सोपवली जबाबदारी…
Gold Rate महागाईवर चांगला पर्याय
महागाई दाराच्या (Inflation) विरोधात सोने नेहमीच प्रभावी राहिले आहे. याच कारणामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेसह (Reserve Bank of India) जगभातील केंद्रीय बँकांनी सोने खरेदी वाढवली आहे. शेअर मार्केट किंवा अन्य प्रकारच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो यात काही शंका नाही पण यामध्ये मोठी स्थिरता येऊ शकते. ही स्थिरता दीर्घकाळ राहू शकते. सोन्याच्या बाबतीत मात्र असे नाही कारण सोन्याचे भाव (Gold Price) नेहमीच कमी जास्त होत राहतात.
Gold Rate युनिव्हर्सल करन्सीची मान्यता
सोने या धातूला युनिव्हर्सल करन्सी म्हणून मान्यता आहे. ज्यावेळी रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine War) केला होता त्यावेळी अमेरिकेच्या नेतृत्वातील पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या (Russia) परकीय गंगाजळीवर जप्ती (Foreign Reserve) आणली. रशियाजवळ जे डॉलर आणि युरो होते त्यांचे मूल्य शून्य झाले. पण जर रशिया डॉलर आणि युरोऐवजी सोन्याचा साठा केला असता तर त्याचे मूल्य शून्य कधीही झाले नसते.