9.8 C
New York

Nitesh Rane : राऊत अन् शहा भेट चर्चेवर काय म्हणाले नितेश राणे

Published:

आमच्या नेत्यांच्या आणि संजय राऊतांच्या भेटीच्या चर्चेवरून संजय राऊतांची मोठी तडफड झाली. एक बापाचे असाल तर.. अशा शब्दांत अमित शहा आणि इतर नेत्यांच्या भेटीवर हे बोलले. (Nitesh Rane) परंतु, ही बातमी कुणी बाहेर आणली? हे पाहिलं पाहिजे. ही माहिती काँग्रेसच्या सुत्रांनी बाहेर आणली. (Sanjay Raut ) त्यामुळे राऊतांची मजल इतपर्यंत गेली की, त्यांनी ज्यांच्यासोबत जागावाटपची चर्चा सुरू आहे त्या काँग्रेसच्या नेत्यांचा बाप बाहेर काढला आहे असं म्हणत संजय राऊत यांच्या टिकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार उत्तर दिल. ते पत्रकारांशी बोलत होते.

तुम्ही जर भेटला नाहीत. तुमच्या मनात काही काळबेर नाही, चोर के दाढी मे तिनखा नसेल तर तुम्हाला राग येण्याचं काहीच कारण नाही. ज्या अर्थी तुमची तडफड होत आहे त्या अर्थी दाल मै कुछ काला हे अन्यथा पूर्ण दाळच काळी आहे असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे. तसंच, त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही घणाघात केला आहे.

…तर लाडक्या बहिणींना दोन हजार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

उद्धव ठाकरे हे कधी बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाहीत. ते काँग्रेसचे होणार आहेत का? याचा काँग्रेसच्या नेत्यांनी विचार करावा. तसंच, अशा भरोसा नसलेल्या राऊतांवर विश्वास ठेवावा असंही राणे यावेळी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी, आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गाडीत पैसे सापडले असा आरोप राऊत यांनी केलाय. त्यावर बोलताना, राऊत यांचा कोणता आरोप खरा ठरलाय असं म्हणत त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही असं म्हटलं आहे.

राजकीय पत्रकारांनी राऊत यांच्याकडे जाण्यापेक्षा मनोरंजन क्षेत्रातील पत्रकारांनी राऊतांच्या मुलाखती घेण्यासाठी जाव्यात. तसंच, यांचे फिल्मी डायलॉग पाहता एकता कपूर यांनी राऊतांना एखाद्या सिरीअलमध्ये काम द्याव असंही राणे यावेळी म्हणालेत. तसंच, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीने भाजपची नाही. परंतु, काँग्रेसच्या यादीने मातोश्रीची झोप उडेल असा टोलाही राणे यांनी यावेळी राऊतांना लगावला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img