9.8 C
New York

Cm Eknath Shinde : …तर लाडक्या बहिणींना दोन हजार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Published:

महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी केलीयं. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मतदान येत्या 20 नोव्हेंबरला पार पडणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबरला पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या घोषणेपासून विरोधकांकडून अफवा पसरवली जात आहे. हा चुनावी जुमला आहे, असं सांगण्यात येत होतं, पण आम्ही घोषणा केल्यानंतर एकाच महिन्यात अंमलबजावणी करुन लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकले आहेत. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

माहीममधून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

तसेच योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर विरोधक म्हणाले पैसे काढून घ्या, नाहीतर सरकार पैसे काढून घेईल पण हे देणारं सरकार आहे. पुढचे हप्तेपण आम्ही बॅंकेत जमा केले आहेत. आचारसंहिता लागल्यावर हे लोकं आडवं मांजर घालतील हे माहित होतं म्हणूनच आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेबंरमध्ये पैसे टाकले असल्याचा खोचक टोला शिंदेंनी लगावला.

राज्यात नोव्हेंबरमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू झालीयं. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना निवडणूक आयोगाकडून स्थगित करण्यात आल्याची अफवा विरोधकांकडून पसरवली जात आहे, पण योजनेची अंमलबजावणी त्याआधीच झालेली आहे. आम्हाला माहित होतं की आचारसंहिता लागल्यावर विरोधक आडवं मांजर घालतीला त्यामुळे त्याआधीच आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे टाकल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img