11.9 C
New York

Mumbai News : महाराष्ट्राचा इतिहास एका निर्णायक वळणावर

Published:

मुंबई / रमेश औताडे

महाराष्ट्राचा राजकीय इतिहास एका निर्णायक वळणावर उभा आहे आणि अशा वेळी जनवादी पक्षाने (Mumbai News) २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ९१ जागा लढवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. ४१ उमेदवारीची पहिली यादी जाहीर केली आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक आणि प्रादेशिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून धोरणात्मकरीत्या ९१ जागा निवडल्या आहेत. अशी माहिती जनवादी पार्टी चे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय सिंह चौहान प्रेस क्लब येथे दिली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र, अर्जुन कुमार राठोड , तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. चौहान यावेळी म्हणाले, जनवादी पार्टीने २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ऐतिहासिक प्रचार सुरू केला आहे. देशात ५ लाख पार्टीचे सभासद आहेत.

ही केवळ निवडणूक विजयाची रणनीती नाही, तर पारंपारिक सत्ता रचनेमुळे लांबून गेलेल्या लाखो उपेक्षित समुदायांसाठी एक निश्चित क्षण आहे असे डॉ. संजय सिंह चौहान यांनी सांगितले. जनवादी पार्टी महाराष्ट्रातील आदिवासी आणि बंजारा समाजाला न्याय, समानता आणि विकास मिळवून देण्याच्या मिशनवर आहे. ऐतिहासिकदृष्ट्या दुर्लक्षित असलेले हे गट, समाजासाठी त्यांचे मोठे योगदान असूनही, मराठा शासक वर्गाने संसाधने आणि लक्षापासून वंचित ठेवले होते. असे डॉ. संजय सिंह चौहान यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img