11.9 C
New York

Jayant Patil : शरद पवारच न्याय देतात हे राहिलेल्यांना सांगा; जयंत पाटलांची फटकेबाजी

Published:

तुम्ही मनात आणलं तर बेलापूरचा आमदार हा तुतारीचा असेल असं म्हणत तुमची मला ताकद माहिती आहे अशा शब्दांत जयंत पाटील यांनी संदीप नाईक यांचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षात स्वागत केलं. ते नवी मुंबईत पक्षप्रवेश सोहळ्यात बोलत होते. तसंच, जेव्हा जेव्हा नवी मुंबईत येत होतो तेव्हा मला काहीतरी हरवलं आहे असं वाटत होतं. परंतु, आता हरवलेलं सापडलं आहे असंही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत.

संदिप नाईक आज जरी इकडं आले असले तरी भाजप किंवा विरोधात असलेले अनेक कार्यकर्ते आणि नेते आमच्या संपर्कात आहेत असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत. चंद्र कलेकलेने वाढतो. आमची तुतारी त्यापेक्षा जोरात वाढतीये असं म्हणत आमची परिस्थिती सर्वात चांगली आहे असंही म्हणाले आहेत. तसंच, आमच्याकडं कुणीच नव्हतं तेव्हा आमच्याकडे आठ खासदार आहेत. जेव्हा सगळे होते तेव्हा फक्त चार खासदार होते असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

आशिष शेलारांच्या भावाला तिकीट मिळताच भाजपात नाराजीनाट्य

आम्ही ठाणे लोकसभाही लढवली असती. परंतु, तुम्ही आमच्याकडे नव्हते असं म्हणत संदिप नाईक हे नसल्याने आमची एक जागा गेली असंही ते म्हणाले. आज अनेक शहरी प्रश्न समोर आलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बेलापूर येथे तुतारीचा विजय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला सगळे मुद्दे लक्षात घेऊन यावेळी मतदान करायचं आहे असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा आपला पक्ष आहे. मी संदीप नाईक यांना शब्द देतो तुम्हाला कुणीही वेगळी वागणूक देणार नाही. त्यामुळे तशी काळजी करू नका. सध्या महाराष्ट्र प्रगतीवरून घसरला आहे. तो पुन्हा एक नंबरवर आणायचा असेल तर आपण सोबत राहून काम करू. बाकी, न्याय देण्याचं काम जेव्हा करायचा असोत तेव्हा फक्त शरद पवारच करू शकतात असंही पाटील यावेळी म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img