11.9 C
New York

Mahavikas Aghadi : जागावाटपावरुन काही तासांतच मविआ तुटणार, मोठ्या नेत्याचा दावा

Published:

जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काही तासांतच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तुटणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असल्याची परिस्थिती आहे. भाजपकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली, तरीही महाविकास आघाडीचा जागावाटपाचा पेच सुटत नसल्याचंच दिसून येत आहे. यातच आता जागावाटपावरुन पुढील काही तासांतच महाविकास आघाडी तुटणार असल्याचा मोठा दावा रामदास कदमांनी केलायं. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडालीयं.

महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरु असताना काँग्रेस नेते नाना पटोले आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात खटके उडाल्याचं दिसून आलं. त्यानंतर नाना पटोले यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा करणार नसल्याची भूमिका ठाकरे गटाकडून घेण्यात आली. त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना जागावाटपावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे पाठवण्यात आलं.

शरद पवारांकडून एबी फॉर्मचं वाटप, पारनेरमध्ये शिवसेनेला धक्का देत राणी लंकेंना संधी

रामदास कदम पुढे बोलताना म्हणाले, जागावाटपावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये प्रचंड मतभेद सुरु झाले आहेत. त्यामुळे पुढील काही तासांतच महाविकास आघाडी तुटणार आहे. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचं बाशिंग गुडघ्याला बांधून बसले आहेत तर काँग्रेस नेते नाना पटोलेही मुख्यमंत्रिपदाचं बाशिंग बांधून बसलेले आहेत. प्रचंड रस्सीखेच सुरु असतानाच शरद पवार दोन्ही पक्षांना संपवून टाकणार असून काही तासांतच महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर पडणार असल्याचा दावा रामदास कदमांनी केलायं.

तसेच उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचा एक आव आणतात, त्यांचे गुण उद्धव ठाकरे यांच्यात नाहीत. ते बाळासाहेबांची स्टाईल मारण्याचा प्रयत्न करतात पण ते ओरिज्नल नाहीत. तसं असत तर ते शरद पवारांच्या मांडीवर बसले नसते, जे कालपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळे घालत होते ते आज एकमेकांच्या छातीवर बसतील, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वाद किती टोकाला गेला हे संर्वांनी पाहिलं असल्याचंही रामदास कदमांनी म्हटलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img