11.9 C
New York

Rohit Pawar  : 25 कोटींची पहिली खेप; अजून चार गाड्या कुठंयंत?, रोहित पवारांचा महायुतीवर वार

Published:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात नोटांच्या बंडलांचा (Electon) महापूर आल्याचं चित्र समोर आलं आहे. आचारसंहितेनंतर पुण्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका वाहनात 5 कोटी रुपयांची रक्कम सापडली. रात्री घडलेल्या या घडामोडींमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Rohit Pawar)  विरोधकांनी याप्रकरणी महायुतीवर जोरदार आरोप केले आहेत.

संजय राऊत यांनी शहाजी बापू यांना चिमटा काढल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही त्यांच्या नावाची री ओढली. एक गाडी पकडली इतर चार वाहनं कुठं आहेत, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मत विकत घेण्यासाठीच हा प्रकार होत असल्याचा घणाघाती आरोपही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या कारचे सांगोला कनेक्शन समोर आल्यानंतर विरोधकांनी शहाजीबापू यांच्याकडे मोर्चा वळवला. शहाजीबापूंनी या सर्व प्रकरणात कानावर हात ठेवले आहेत. तर विरोधकांनी पोलिसांच्या बंदोबस्तात नोटा पोहचवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत यांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.

सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून, काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या डोंगार, झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? असा खोचक सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. त्यांनी ट्विटरवर याविषयीची पोस्ट केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img