11.9 C
New York

Sharad Pawar NCP : शरद पवारांकडून एबी फॉर्मचं वाटप, पारनेरमध्ये शिवसेनेला धक्का देत राणी लंकेंना संधी

Published:

आजपासून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. काही दिवसापूर्वी भाजपने (BJP) आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील तब्बल 17 जणांना एबी फॉर्म दिले आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने (Sharad Pawar NCP) देखील उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. सध्या माहितीनुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार निलेश लंकेंच्या (Nilesh Lanke) पत्नी राणी लंकेसह (Rani Lanke) आणखी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहे. तर दुसरीकडे पुढील एक- दोन दिवसात महाविकास आघाडीकडून (MVA) उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून पारनेर विधानसभेसाठी राणी लंके यांना एबी फॉर्म दिल्याने पारनेर विधानसभा मतदारसंघात अनेक चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये ही जागा शिवसेनेला (ठाकरे गट) मिळणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार श्रीकांत पठारे यांनी तयारी देखील सुरु केली होती मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) राणी लंके यांना एबी फॉर्म दिल्याने राणी लंके पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

अजितदादांचे स्टार प्रचारक ठरले; मुश्रीफ, तटकरे, मुंडे, भुजबळांवर सोपवली जबाबदारी…

तर दुसरीकडे राणी लंके यांच्यासह पक्षाने मुंबईतून घाटकोपर पूर्वसाठी राखी जाधव, चिपळूण विधानसभेसाठी प्रशांत यादव यांना एबी फॉर्म देत कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शिवसेनेकडून (ठाकरे गट) देखील उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.

माहितीनुसार, राजापूर लांजा विधानसभेचे विद्यमान आमदार राजन साळवी, कुडाळ विधानसभेचे आमदार वैभव नाईक यांना ठाकरे गटाकडून एबी फॉर्म देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील एक – दोन दिवसात शरद पवार यांच्या पक्षाकडून देखील उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे.

पहिल्या यादीमध्ये रोहित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, उत्तमराव जानकर, राजेंद्र शिंगणे, प्राजक्ता तनपुरे,रोहिणी खडसे, समरजितसिंह घाटगे, नंदिनी बाभुळकर आणि मदन कारंडे यांच्या नावांचा समावेश असू शकते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img