विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळचं राहणार आहे. पवार गटाने दाखल केलेल्या चिन्हाबाबातच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने वरील निर्देश दिले आहे. कोर्टाचा हा निकाल अजितदादांसाठी दिलासा तर, शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गटाची चिन्हाबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचं चिन्ह ‘घड्याळ’च राहणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.
Supreme Court याचिकेत चिन्ह गोठवण्याची केली होती मागणी
महाराष्ट्रातील निवडणुकीच्या आधी घड्याळ चिन्ह गोठवावं. हे चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळा ऐवजी दुसरं चिन्ह देण्याची मागणी शरद पवार यांच्या वतीने करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट या याचिकेवर निर्णय होण्याच्या प्रतिक्षेत होता अखेर आज (दि. 22) यावर निकाल देण्यात आला आहे.
…तर लाडक्या बहिणींना दोन हजार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गट वेगळे झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. त्यामुळे त्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरु देऊ नये, अशी मागणी केली होती.