7.5 C
New York

Assembly Election : मोक्याच्यावेळी अजितदादांना मोठा धक्का; पवारांनी ‘नाना’ म्हणत ‘काटे’ फिरवले

Published:

भाजपनं रविवारी (दि.20) विधानसभेसाठी 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. जाहीर करण्यात आलेल्या या यादीत पिंपरी-चिंचवडमधून भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांना देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी नाट्य पाहण्यास मिळत असतानाच आता शरद पवारांनी नाराजी नाट्यातच आता ऐन मोक्याच्यावेळी अजित पवारांना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.

Assembly Election काटे बंडखोरीच्या तयारीत?

अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटेंची (Nana Kate) चिंचवड विधानसभा (Chinchwad Assembly) लढण्याची इच्छा आहे. मात्र, आता या मतदारसंघातून भाजपनं शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता नाराज नाना काटे समर्थकांसह शरद पवारांना भेटण्यासाठी मुंबईत डेरेदाखल झाल्याचे सांगितले जात आहेत. त्यामुळे आता जर काटे यांनी बंडखोरी करत शरद पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवल्यास शंकर जगताप आणि नाना काटे यांच्यात थेट लढत होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप हे उमेदवार असतील मात्र महाविकास आघाडी कडून कुठला उमेदवार असणार हे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, तेच नाना काटे आज महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांचे राष्ट्रवादमध्ये आहेत. मात्र काही झालं तरी भाजपचा काम करणार नाही आणि निवडणूक लढवणारच असा पवित्रा त्यांनी घेतल्याने ते काय निर्णय घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Assembly Election पवारांना उमेदवार आयात करावा लागणार

आजघडीला चिंचवड विधानसभा मतदारसंघात शरद पवारांकडे उमेदवार म्हणून तगडा कुठलाही राजकीय नेता दिसत नाहीये. पोटनिवडणुकीत ज्या नाना काटेंनी अश्विनी जगताप आणि भाजपला मोठी टक्कर दिली होती, ते आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून काटे यांची ओळख आहे. मात्र, आता चिंचवडची जागा भाजपला गेल्याने आणि शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काटे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. याच संधीचा फायदा घेत पवारांकडून नाना काटे यांच्या उमेदवारीचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

शरद पवारच न्याय देतात हे राहिलेल्यांना सांगा; जयंत पाटलांची फटकेबाजी

Assembly Election काटे जयंत पाटलांच्या संपर्कात

महायुती चिंचवडची जागा भाजपला सुटणार याची कुणकुण बहुदा काटे यांना पूर्वीपासूनच होती. त्यामुळे काटे यांनी आपल्याला उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडीचा पर्याय खुला असल्याचे संकेत दिले होते. एवढेच नव्हे तर, काटे गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटलांच्या संपर्कात होते आणि त्यांनीच आज (दि. 22) पवार आणि काटे यांच्या भेटीचा योग जुळवून आणल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जर काटे यांनी विधानसभेच्या तोंडावर हाती तुतारी घेतल्यास चिंचवडमधील समीकरणं बदलण्याबरोबरच अजितदादांसह महायुतीला याचा जोरदार फटका बसू शकतो. त्यामुळे आता पावरांच्या भेटीनंतर नाना काटे हातातून घड्याळ बाजूला काढून हाती तुतारी घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Assembly Election काटेंकडून शुभेच्छांचा फोन आला नाही

नाना काटे बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना भाजपचे उमेदवार शंकर जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष योगेश बहल यांच्यासोबत समन्वयाची बैठक झालेली आहे. महायुतीतील वरिष्ठ नेते एकत्र बैठक घेवून यावर निश्चित तोडगा काढतील, असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला. नाना काटे यांच्यासोबत बोलणं होतंच असतं. परंतु उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा शुभेच्छांचा फोन आलेला नाही, असेही शंकर जगताप म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img