9.8 C
New York

Sanjay Raut : ‘मविआ’ सोडणार का?, संजय राऊतांनी सगळं पिक्चरचं क्लियर करून टाकलं

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. यावेळी मुख्य लढत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाबात चर्चा अंतिम टप्प्यात येत आहे. यातच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस (Congress) आणि शिवसेनामध्ये (Shiv Sena) काही जागांवरून वाद निर्माण झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

या वादामुळे शिवसेना विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उतरणार असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात भेटी झाली असल्याचा दावा देखील काँग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात आला होता त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. तर आता या प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं, आमदार यशोमती ठाकूर यांचे मोठे विधान

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अश्या बातम्या जे लोक पसरवत आहे त्यांनी भाजपची सुपारी घेतली आहे. आम्ही कधीही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. या शक्तींशी खरोखर ज्यांनी सर्वात जास्त संघर्ष केला असेल तर ते शिवसेनाने केला आहे असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच कोणतीही शहानिशा न करता बातम्या दाखवल्या जात आहेत असेही यावेळी खासदार राऊत म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही छातीठोकपणे करतो. आमची भूमिका संविधान विरोधी शक्तीचा आम्ही एकत्र राहून पराभव करू अशी आहे असं म्हणत त्यांनी शिवसेना विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत लढणार असल्याची माहिती दिली. तसेच आतापर्यंत महाविकास आघाडीमध्ये 210 जागांवर चर्चा पूर्ण झाली आहे आणि येत्या काही दिवसात याची घोषणा होणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.

तर दुसरीकडे भाजपवर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले की, या लोकांनी आमच्या लोकांना तूरुंगात टाकले, सरकार पाडलं, पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, त्याहीपेक्षा महाराष्ट्र गद्दारांच्या हातात दिला ही वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला त्यामुळे आमच्यावर शंका घेणारे एक बापाची औलाद नाही मग ते कोणत्याही पक्षाचे असोत असं देखील ते म्हणाले तसेच त्यांच्याशी हातमिळवणी करणं म्हणजे औरंगजेब अफजलखानाशी हात मिळवणी केल्यासारखं असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img