8.2 C
New York

Chandrakant Patil : आमचं नेमकं कुठं चुकलंय? चंद्रकांतदादांचं जरांगे पाटलांना हात जोडून आवाहन

Published:

आमचं नेमकं कुठं चुकलंय, आपण मुद्द्यांवर लॉजिकल चर्चा करु, या शब्दांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना हात जोडून विनंती केलीयं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलंय. राज्यातील काही मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलीयं. जरांगे यांच्या या घोषणेनंतर चंद्रकात पाटील यांनी जरांगे यांना मुद्द्यांवर चर्चा करण्याचं आवाहन केलंय. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मनोज जरांगे यांना आम्ही वारंवार हात जोडून आवाहन करीत आहोत, आमचं नेमकं चुकलंय काय? मराठा समाजला न दिलेलं आरक्षण आम्ही दिलंय. उद्धव ठाकरे यांनी आरक्षण घालवलं हे योग्य होतं का? एकनाथ शिंदे यांनी आरक्षण दिलं हे चुकीचं होतं का? आरक्षण नाही तर सुविधा देणं हे चुकीचं होतं का? आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करु, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांन मनोज जरांगे यांना केलंय.

आम्ही लढणार, पाडणार अन् जिरवणारच; जरांगेंचा इशारा

तसेच आरक्षण आणि सुविधा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आरक्षण गेलं तरीही सुविधा देणं हे आमचं चुकलं का? असा सवाल करत पाटील म्हणाले, ईडब्लूएस हेच मराठ्यांचं आरक्षण असू शकतं कारण हेच आरक्षण न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात टिकलं आहे. यामध्ये केवळ तीन जातींपूरतं राहिलं बाकी 21 जातींसाठी झालं आहे. मराठा समाजातील लोकांसह इतरांना साडेआठ टक्के हे आरक्षण मिळालंय. सर्वोच्च न्यायालयातून मिळालेलं आरक्षण आपण ढोरल तुम्ही ऐकलं नाही, आता समाज म्हणतोयं की आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारलीयं, हात जोडून जरांगेंना विनंती आहे की, मुद्द्यावर आपण बोलूयात, असं आवाहन मनोज जरांगे यांना केलंय.

दरम्यान, मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार सक्षम असून मनोज जरांगे यांनी येऊन चर्चा करावी. मराठा समाजाचं एसईबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही मनोज जरांगे यांना बॉंडवर लिहून द्यायला तयार आहोत, याचा मनोज जरांगे यांच्यासह राज्यातील मराठा समाजबांधवांनी सकारात्मक विचार करावा, असंही आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img