राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून भाजपची (BJP) पहिली यादी काल जाहीर झालीय. यात विद्यमान आमदारांना या यादीत 99 उमेदवारांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील उमेदवारी देण्यात आलीय. भाजपची पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सध्या पक्षाचे संघटनात्मक पद आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. असे असताना देखील बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली (Assembly Election) आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, परफॉर्मिंग किंवा नॉन परफॉर्मिंग हा पॅरामीटर नसतो. त्या त्या काळातील निवडणुकीचं गणित असतं. कधी कुणाला थांबावं लागतं, कधी कुणाला यावं लागतं. मागच्या वेळी मला थांबावं लागलं, संघटनेचं काम करावं लागलं. यावेळी मला संधी दिली.
शेवटी काय आहे की, त्या त्या वेळेत अनुकूल निर्णय करावे लागतात, असं चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत. उमरेडची जागा परंपरागत भारतीय जनता पार्टीची आहे. मागील 30 वर्षाचा कार्यकाल पाहता उमरेड ही भाजपाची जागा आहे. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना विनंती केलीय. भारतीय जनता पार्टीची दुसरी आणि तिसरी यादी लवकरच येईल, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
आज मनसे, शिंदे गट आणि अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता ?
चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय. मागील वेळेस भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आता पुन्हा मैदानात उतरले आहे. ते पुन्हा विजयाचा गुलाल उधळणार का? जनता बावनकुळेंना कौल देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधलाय. राज्यातील जनता नक्कीय महायुतीला निवडून देईल. जनतेला विकास हवाय असुन महायुतीकडे विकासाचा अजेंडा असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांकडे केवळ तोंडाच्या वाफा असल्याची टीका केलीय. आम्ही पुढील पाच वर्षे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न करणार आहोत, असं आश्वासन देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय.