खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याने सोमवारी पुन्हा एकदा एअर इंडियाचे विमान (Air India plane) उडवून देण्याची धमकी दिली आहे. 1 ते 19 नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियाच्या विमानांना लक्ष्य केले जाऊ शकते, असे त्याने आपल्या धमकीत म्हटले आहे. याकाळात एअर इंडियाच्या विमानांमध्ये प्रवास न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिखांविरोधी दंगलीला 40 वर्षे पूर्ण झाल्याचा हवाला देत सोमवारी ही धमकी देण्यात आली. गतवर्षीही याच दरम्यान, त्याने धमकी दिली होती. पन्नू शिख फॉर जस्टिस नावाच्या संघटनेचा संस्थापक आहेत. तो कॅनडा आणि अमेरिकेत लपला असल्याची माहिती आहे. त्याच्याकडे दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे.
दरम्यान, पन्नूने म्हटलं आहे की, शीख नरसंहाराला 40 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळं एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो. 1984 मध्ये 13 हजारांहून अधिक शीख, महिला आणि मुले मारली गेली. आजही दिल्लीत विधवा वसाहत आहे. ही संपूर्ण घटना भारत सरकारने घडवून आणली होती. परदेशात प्रवास करणाऱ्यांनी 1 ते 19 नोव्हेंबरपर्यंत एअर इंडियावर बहिष्कार टाकावा, असं तो म्हणाला.
‘मविआ’ सोडणार का?, संजय राऊतांनी सगळं पिक्चरचं क्लियर करून टाकलं
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतीय विमान कंपन्यांना धमक्या येत आहेत. एअर इंडियाशिवाय आकासा एअर, विस्तारा, इंडिगो आणि स्पाइसजेट या कंपन्यांनाधमक्या मिळाल्या आहेत. डीजीसीए या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. अशातच आता पन्नूने धमकी दिली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली. नोव्हेंबर 2023 मध्येही अशीच धमकी दिली होती.
Air India plane पन्नूवर अनेक गुन्हे दाखल…
दरम्यान, गुरपतवंत सिंग हा भारतविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याची माहिती समोर आली आहे. पन्नू भारताविरुद्ध भडकाऊ भाषणेही देतो. तो खलिस्तानच्या नावाखाली तरुणांची माथी भडकावण्याचे काम करतो. त्यामुळे भारत सरकारने त्याला दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्यावर फुटीरतावादाला प्रोत्साहन देणे, पंजाबमधील शीख तरुणांना देशाविरुद्ध शस्त्रे उचलण्यास प्रवृत्त करणे आणि भडकाऊ भाषणे केल्याप्रकरणी गुन्हे आहेत.