पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नव्याने उद्घाटन झालेल्या मंडई मेट्रो स्टेशनला मध्यरात्री भीषण आग (Pune Fire) लागण्याची घटना घडली आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास मंडई मेट्रो स्टेशन येथे तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. अग्निशमन दलाकडून तातडीने 5 वाहने रवाना करीत आग आटोक्यात आणणयाचं काम झालं. या घटनेत कोणीही जखमी नसून वेल्डिंगचे काम सुरु असताना आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
नियंत्रणात सध्या आग आणण्यात आली असून, कोणीही यामध्ये जखमी नसल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाकडून तातडीने 5 वाहने रवाना करत आग पाचच मिनिटात आटोक्यात आणली. अग्निशमन उपकरणाचा वापर करत जवानांनी श्वसनरहित पाणी मारुन आग विझवली. जखमी कोणी नसून वेल्डिंगचे काम सुरु असताना आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मोठी बातमी! काँग्रेसच्या 54 उमेदवारांची यादी निश्चित
Pune Fire सेवेवर परिणाम नाही
खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावप पोस्ट करत घटनेची माहिती दिली आहे. तसंच मेट्रो सेवेमध्ये कोणताही परिणाम होणार नसल्याचं देखील खासदार मोहोळ म्हणाले आहेत. मोहोळ यांनी लिहिलं आहे की, मंडई मेट्रो स्टेशनची आग नियंत्रणात, सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार मंडई मेट्रो स्टेशनला काही वेळापूर्वी घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.