8.2 C
New York

Raj Thackeray : भाजप पाठोपाठ आता राज ठाकरेंकडून उमेदवारांची घोषणा

Published:

भाजप पाठोपाठ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही (Maharashtra Navnirman Sena) आपल्या उमेदवारांची घोषणा केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray)अविनाश जाधव (Avinash jadhao) आणि राजू पाटील (Raju Patil) यांची उमेदवारी घोषित केली. राजू पाटील हे कल्याण ग्रामीणमधून तर अविनाश जाधव ठाण्यातून निवडणूक लढवणार आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासोबत युती केली होती. आता विधानसभेसाठी राज ठाकरेंनी महायुतीसोबत न जाता स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढण्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान, आज मनसेच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा केली. ठाण्यातून अविनाश जाधव तर कल्याण ग्रामीणमधून विद्यमान आमदार राजू पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.

यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीत उमेदवारांच्या यादीवर हात फिरवला जात आहे. आज किंवा उद्या पक्षाची दुसरी यादी होईल. यादी जाहीर करण्यापूर्वी ठाण्यातून राजू पाटील आणि अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करतो, असं ठाकरे म्हणाले.24 तारखेला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी येणार आहे. अर्ज भरताना कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने यावे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.

आमचं नेमकं कुठं चुकलंय? चंद्रकांतदादांचं जरांगे पाटलांना हात जोडून आवाहन

Raj Thackeray राजू पाटील यांना सुभाष भोईर यांचे आव्हान….

आता मनसे महायुतीतीतून बाहेर पडल्याने राजू पाटील यांना कल्याण ग्रामीणमध्ये एकाकी लढत द्यावी लागणार आहे. राजू पाटील दुसऱ्यांदा ही जागा लढवत आहेत. राजू पाटील यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुभाष भोईर आणि शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात भाजपकडून उमेदवारीसाठी कल्याण ग्रामीणचे प्रमुख नंदू परब जोरदार प्रयत्न करत आहेत.

यापूर्वी राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर (शिवडी, मुंबई), दिलीप धोत्रे (पंढरपूर), संतोष नागरगोजे (लातूर ग्रामीण), बंडू कुटे (हिंगोली विधानसभा), मनदीप रोडे (चंद्रपूर), सचिन भोयर (राजुरा), राजू उंबरकर (यवतमाळ) हे उमेदवार घोषित केले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img