12.9 C
New York

Junnar : जुन्नर तालुक्यात परतीच्या पावसाने सोयाबीनसह भात शेताचे नुकसान

Published:

ओतूर,प्रतिनिधी: ( रमेश तांबे )

सध्या परतीच्या पावसामुळे दाणादाण सुरू असून, दररोज सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचे आगमन होत आहे. गेल्या आठ दहा दिवसांपासून दररोज सायंकाळच्या सुमारास कोसळत असलेल्या मुसळधार स्वरूपातील परतीच्या पावसाचा सोयाबीन पिकासह भातशेतीला चांगलाच फटका बसत असल्याने भात पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. काढणीस आलेले सोयाबीन व भात कापणीची कामे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांनी टाकलेली कांद्याची रोपे  मुसळधार पावसामुळे सडून गेली आहे. तर बऱ्याच ठिकाणी रोपांची मर झालेली दिसत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. जुन्नर तालुक्याचे आदिवासी भागात कापणी योग्य भातपीक पावसामुळे जमिनीवर कोसळले आहे.

पीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाच्या पाण्यात कुजून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील चार-पाच दिवसांपासून दैनंदिन दुपारनंतर सायंकाळपर्यंत उशिरा विजांच्या कडकडाटासह ओतूर आणि पंचक्रोशीत मुसळधार धो -धो पाऊस पडत आहे.

Junnar जुन्नर तालुक्यातील आदिवासी

भागातील घाटघर,तळेचीवाडी,अंजनावळे,देवळे,रानचरी,खैरे,खटकाळे,तळेरान,तळमाची,खुबी,करंजाळे,सांगनोरे,खिरेश्वर,कोल्हेवाडी,कोपरे,मांडवे,मुथाळणे,जांभुळशी आदी ठिकाणच्या पावसाळी हंगामातील भातशेती कापण्यासाठी तयार झाली असतानाच परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने  शेतकऱ्यांची भाताची रोपे पाण्यात भिजली आहे तर, काही ठिकाणी उभी भातपिके आडवी झाली आहेत.

शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर पडली आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती व शेतकरीवर्गाचे आतोनात नुकसान होऊ लागले आहे. काही शेतकरी वर्गाने सोयाबीन काढणी तसेच भात कापणीही केली आहे.

शासनाने आदिवासी पट्ट्यातील भातरोपांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आदिवासी भागातील देवराम डावखर,संदिप घोडे,डॉ.किसन कोकाटे आदी आदिवासी बांधवांनी केली आहे.

तसेच तालुक्यातील ओतूर,उदापूर,मांदारणे,नेतवड,आलमे,

अहिनवेवाडी,माळवाडी,बल्लाळवाडी,डिंगोरे,मढ,पिंपळगाव जोगा,धोलवड,रोहोकडी,आंबेगव्हाण पाचघर,उंब्रज,पिंपरी पेंढार,गायमुखवाडी,डुंबरवाडी आदी गावातील

शेतकरी वर्गाच्या शेतातील सोयाबीन तसेच भाताच्या ओंब्या अक्षरक्ष: पाण्यात बुडाली आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत प्रचंड मेहनत करून शेतकरी वर्गाने आपापली शेती चांगली सांभाळून ठेवली. आत्तापर्यंत पिकेही जोमदार आली असतानाच परतीचा पाऊस सक्रिय झाल्याने शेती क्षेत्रावर मोठे संकटच कोसळले आहे.  त्यामुळे या पावसामुळे अनेक शेतकरी वर्गाचे फार मोठे नुकसान झाले आहे.

पुढील काही दिवसांवर येऊन ठेपलेला दिपावली सणाचा विचार केला असता आणि पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर शेतकरी वर्गाची दिवाळी अंधारात जाणार असल्याची भितीही शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img