महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काँग्रेसवर नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ठाकरे गट ‘प्लॅन बी’ वर काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्व 288 जागांसाठी तयारी करत आहे. म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये जागावाटप झाले नाही तर ठाकरे स्वबळावर निवडणूक लढवू शकतात. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे काँग्रेसपासून दूर गेले तर ते भाजपसोबत जाणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे यांच्या दबावापुढे काँग्रेस पक्ष झुकणार नसल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
Uddhav Thackeray काँग्रेसच्या दाव्याला धक्का
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यातून त्यांच्या बोलण्याचा रोख समजत होता. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. एवढेच नाही तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांचीही भेट घेतली. मात्र, चर्चा कोणत्या मुद्द्यांवर झाली हे स्पष्ट झालेले नाही.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्या प्रकारे दबावतंत्राचा अवलंब करत आहे, ते पाहता जागावाटपात विलंब होणार असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठींना काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की शिवसेना अशा जागांची मागणी करत आहे जिथे मुस्लिम मतदार जास्त आहेत आणि जिथे 100 टक्के निवडणूक काँग्रेसचे उमेदवार जिंकू शकतात. या जागा आम्ही सोडणार नसून या जागांची चर्चा शेवटपर्यंत सुरूच राहणार असल्याचं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले. काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत लोकसभेतील काँग्रेसची कामगिरी लक्षात घेता आणि त्या आम्ही मिळवू.
Uddhav Thackeray काय म्हणाले संजय राऊत?
जागावाटपाबाबत शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सोमवारी (२१ ऑक्टोबर) सांगितले की, आमची चर्चा सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत फायनल होईल. आपण सर्वजण एकत्र बसून निर्णय घेऊ. काँग्रेस हायकमांडशी चर्चा सुरू आहे. प्रदेश काँग्रेसचे नेते आमचे मित्र आहेत. सीट शेअरिंगमध्ये प्रत्येकाला थोडा थोडा त्याग करावा लागतो. काँग्रेसची हायकमांड दिल्लीत बसली आहे. महाराष्ट्रातील MVA मध्ये शरद पवार यांच्याराष्ट्रवादी काँग्रेससोबत, काँग्रेस आणि शिवसेना (UBT) यांचा समावेश आहे. या युतीची स्पर्धा भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आहे.