मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय. मराठा बांधवांना संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले की, आपण कायम इतक्या संख्येने एकत्र येता म्हणून सगळेच घाबरलेत. सगळ्यांनाच वाटत हे आपल्याला पाडतेत की काय असं वाटतंय. ज्या वाटेला जायचं नव्हतं, त्या वाटेला फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलं.
राजकारण ही गरजवंत मराठ्यांची वाट नाही. फक्त मुलांच्या भविष्यासाठी आम्ही हा लढा उभा केलाय. राजकारण मनात ठेऊन कधीच आम्ही हा लढा लढलो नाहीत. परंतु, जे नको त्या वाटेला आम्हाला आणलं आहे असं मत मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं. ते अंतरवाली सराटी येथे आयोजित सभेत बोलत होते. ते विधानसभेला (Maharashtra Assembly election) लढायचं की पाडायचं यावर भाष्य करणार आहेत.
जरांगे म्हणाले की, आम्हाला हिंदूत्व मान्य आहे. आम्ही हिंदू आहोत. आमचे विचार छत्रपाती शिवरायांच्या हिंदुत्वाचे आहेत. आज जेव्हा दंगली होतात, तेव्हा मराठा हिंदू तुम्हाला पाहिजे. पण मराठ्यांचा हक्क देण्याची वेळ आली तर तेव्हा तुम्हाला मराठे चालत नाहीत? हे कसलं हिंदुत्व असा प्रश्नही जरांगे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे. छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस हिंदूच आहेत. मात्र, त्यांना मराठे चालत नाहीत असा घाणाघातही यावेळी जरांगे पाटील यांनी यावेळी केलाय. आजपर्यंत मराठ्यांच्या रागीट स्वभावाचा राजकीय नेत्यांनी मोठा फायदा घेतला. मराठ्यांना पाटील म्हटलं की, हे भांडणाला तयार असतात. मराठ्यांना लढवत ठेवलं आणि यांनी फक्त मलिदा खाल्लाय असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.
भारतीय जनता पक्ष मतदार यादीत घोटाळे करतोय; संजय राऊतांचा गंभीर आरोप
देवेंद्र फडणवीस यामाणसा इतका क्रूर माणूस जगात नाही. इंग्रज बाहेरून आले होते. हे इथल्या इग्रजांसारखे आहेत. यांनी आमच्या माता भगिनींच्या डोक्यात गोळ्या घातल्या, इतका नीच आणि क्रूर माणूस या देशाने कधी पहिला नाही असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत. आमचे सगळे काम सोडून महिलांना 1500 रुपये सुरु केलेत. ज्यांनी काहीच मागितलं नाही, त्यांना आरक्षण दिलं असं म्हणत जरांगे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केलं.
भाजप पक्ष वाईट नाही. यामध्ये चालवणारे सगळ्यात वाईट आहेत, असं म्हणत फडणवीस यांनी पक्षात ही घाण केली असंही जरांगे यावेळी म्हणालेत. देवेंद्र फडणवीस यांनी कायम प्रत्येक क्षेत्रात राजकारणच केलंय. कशाला भाव नाही, शिक्षणासाठी मोठी फी लागते. आम्ही कस शिक्षण घ्यायचं ? आनंदाचा शिदा देऊन फसवणार. परंतु, आमचं जे आहे ते द्या आम्हीच तुम्हाला प्रत्येक वर्षी तुम्हाला शिदा देतो, असंही पलटवार जरांगे पाटील यांनी केलाय.