राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Assembly election) बिगुल वाजला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवारी याद्या निश्चित होणार आहेत. त्यात आता उद्धव ठाकरे (Shiv Sena Thackeray group) यांच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हामध्ये (symbol) काहीसा बदल करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला सुधारित मशाल चिन्हे (mashaal) दिले आहे. जुन्या मशालमध्ये बदल करण्याची मागणी ठाकरे गटा/strong>कडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.
ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीमध्ये मशाल चिन्हावर निवडणूक लढविण्यात आली होती. परंतु या चिन्हामध्ये काही त्रुटी होत्या. हे चिन्ह आयस्क्रीमच्या कोनासारखे दिसत होती. त्यावरून ठाकरे गटाकडून टीकाही होत होती. जुन्या चिन्हामध्ये भगवा रंग ही होती. आता मात्र स्पष्टपणे दिसणारे ठाकरे गटाला मिळाले आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरे शिवसेना कुणाची याचा वाद निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या वर्षी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव दिले होते. त्यानंतर चिन्हाचा वाद झाला होता. ठाकरे गटाने त्रिशूल, उगवता सूर्य आणि गदा गहे तीन चिन्हापैकी एकाची मागणी केली होती. परंतु हे चिन्ह देण्यात आले नव्हते. शिवसेना फुटीनंतर भारतीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘मशाल’ चिन्ह आणि शिंदे यांच्या गटाला ‘दोन तलवारी आणि ढाल’ चिन्ह दिले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाले होते. तर मशाल चिन्ह ठाकरे गटाकडे राहिले आहे.
Shiv Sena Thackeray group पहिले निवडणूक ज्वलंत मशालवर चिन्हावर
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने 1985 मध्ये ‘ज्वलंत मशाल’ चिन्हावर विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले होते.