राज्यात आता महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जागावाटप (Maharashtra Assembly Elections 2024) अंतिम टप्प्यात आले आहे. दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांकडून तसा दावा केला जात आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा वेगाने पुढे सरकत आहे. काल मध्यरात्री महाविकास आघाडीची बैठक सुरू होती. हॉटेल ट्रायडंटमधील या बैठकीत मविआच्या नेत्यांनी जवळपास सर्वच जागांवरील तिढा सोडवल्याचे दिसत आहे. त्यामुळे आघाडीची जागावाटपाची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत मुंबई आणि विदर्भातील जवळपास २८ जागांवरून तिढा निर्माण झाला होता. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद झाला होता. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका झाली होती. ठाकरे गटाने विदर्भातील काही जागा मागितल्या होत्या. परंतु, काँग्रेस जागा सोडण्याच्या मूडमध्ये नव्हती. काँग्रेसने तुटेपर्यंत ताणू नये असा इशाराही ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिला होता. त्यामुळे काही जागांवरून दोन्ही गटाच्या नेत्यांनी दबावाचं राजकारण सुरू केलं होतं.
विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला ‘नवी मशाल’
या पार्श्वभुमीवर शनिवारी सायंकाळी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक हॉटेल ट्रायडंटमध्ये सुरू झाली होती. रात्री १ वाजेपर्यंत ही बैठक चालली. या बैठकीत नेत्यांनी जवळपास सर्व जागांवरील तिढा सोडवल्याची सांगण्यात येत आहे. या जागावाटपात काँग्रेस आणि ठाकरे गटाला १०० पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. या बैठकीसाठी खासदार संजय राऊत, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर महाविकास आघाडीकडून आज किंवा उद्या संयुक्त पत्रकार परिषद घऊन जागांची यादी जाहीर करण्यात येईल अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली.
Mahavikas Aghadi काँग्रेस-ठाकरे गटात सर्वकाही आलबेल
विदर्भातील जागा वाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज (दि.19) काँग्रेस हायकमांडचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेस आणि ठाकरे गटात कोणतेही वाद नसून, मविआतही सर्वकाही आलबेल आहे. जागा वाटपाबाबत राऊत, पटोले आणि जयंत पाटील यांच्यात दुपारी जागा वाटपाबाबत एकत्रित चर्चा होणार असल्याचे चेन्नीथला म्हणाले. दरम्यान, या बैठकीआधी शरद पवार गट त्यानंतर ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली होती. ठाकरे गटाच्या ३२ संभाव्य उमेदवारांची यादी काल बाहेर आली होती. यामध्ये