8.2 C
New York

Helmet Compulsory : पुण्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती; आदेशाचं उल्लंघन केल्यास…

Published:

पुणे शहरामधून एक मोठी बातमी समोर आलीय. जर तुम्ही शहरामध्ये दुचाकीवरून प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. पुणे शहरात आता सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचं करण्यात (government employees) आलंय. सरकारी कर्मचाऱ्यांना उद्यापासून हेल्मेट सक्ती (Helmet Compulsory) विभागीय आयुक्तांनी केलेली आहे. शहरात सातत्याने होणारे अपघात आणि नागरिकांची सुरक्षा या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आलेले आहेत.

आता दुचाकीवरून कार्यालयात येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सक्ती करण्यात आलीय. हेल्मेट न घालता कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पूलकुंडवार यांनी दिले (Pune News) आहेत. पुण्यात विविध सरकारी खात्याचे सुमारे 50 हजार कर्मचारी आहेत. दुचाकीवरून कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. विभागीय आयुक्तांच्या या आदेशाकडे सरकारी कर्मचाऱ्यांनी कानाडोळा केल्यास त्यांना ही चूक महागात पडू शकते.

अजितदादांना धक्का! पुण्यातील कट्टर समर्थक नेता सोडणार साथ

या आदेशानुसार, आता उद्यापासून पुणे शहरात हेल्मेट न घालता कार्यालयामध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलाय. यासंबंधीचं पत्रक सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांसाठी 21 ऑक्टोबर रोजी काञण्यात येणार आहेत. रस्ता सुरक्षा समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

पुणे शहरामध्ये सामान्य नागरिकांचा हेल्मेट सक्तीला विरोध आहे. त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये हेल्मेट सक्ती केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना करण्यात आलीय.
दुचाकीवरून कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुणे शहरात मोठा आकडा आहे. रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी यांसदर्भात बैठक घेऊन विभागीय आयुक्तांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पुण्यात दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं सक्तीचं आहे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img