8.2 C
New York

BJP : महायुतीचं जागावाटप फायनल; भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Published:

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आजचा दिवस महत्वाचा ठरला. महायुतीतमधील प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीने (BJP) ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत भाजपाच्या दिग्गज नेत्यांना तिकीट मिळालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डीतून तिकीट मिळालं आहे.

या यादीत देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून तिकीट मिळालं आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मागील निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलं होतं. यंदा मात्र भाजपने त्यांना संधी दिली आहे. बावनकुळेंना कामठी मतदारसंघातून तिकीट फायनल झालं आहे. या यादीत जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन, बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार, भोकरमधून खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार, मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा, कुलाब्यातून राहुल नार्वेकर, सातारा मतदारसंघातून छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

BJP वाचा संपूर्ण यादी :

1) नागपूर दक्षिण पश्‍चिम – देवेद्र फडणवीस

2) कामठी – चंद्ररशेखर बावनकुळे

3) शहादा (आजजा) – राजेश पाडवी

4) नंदुरबार (अजजा) – विजयकुमार गावीत

5) धुळे शहर – अनुप अग्रवाल

6) शिंदखेडा – जयकुमार रावल

7) शिरपूर (अजजा) – काशिराम पावरा

8) रावेर – अमोल जावळे

भाजपच्या पहिल्या यादीत किती महिलांना स्थान?

9) भुसावळ (अजा) – संजय सावकारे

10) जळगांव शहर – सुरेश भोळे

11) चाळीसगाव – मंगेश चव्हाण

12) जामनेर – गिरीश महाजन

13) चिखली – श्वेता महाले

14) खामगांव – आकाश फुंडकर

15) जळगांव (जामोद) – डॉ. संजय कुटे

16) अकोला पूर्व – रणधीर सावरकर

17) धामणगांव रेल्वे – प्रताप अडसद

18) अचलपूर – प्रवीण तायडे

19) देवळी – राजेश बकाने

20) हिंगणघाट – समीर कुणावार

21) वर्धा – डॉ. पंकज भोयर

22) हिंगणा – समीर मेघे

23) नागपूर-दक्षिण – मोहन माते

24) नागपूर-पूर्व – कृष्णा खोपडे

25) तिरोडा – विजय रहांगडाले

26) गोंदिया – विनोद अग्रवाल

27) आमगाव (अजजा) – संजय पुराम

28) आरमोरी (अजजा) – कृष्णा गजबे

29) बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार

30) चिमूर – बंटी भांगडिया

31) वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार

32) राळेगांव – अशोक उइके

33) यवतमाळ – मदन येरावार

34) किनवट – भीमराव केराम

35) भोकर – श्रीजया चव्हाण

36) नायगांव – राजेश पवार

37) मुखेड – तुषार राठोड

38) हिंगोली – तानाजी मुटकुले

39) जिंतूर – मेघना बोर्डीकर

40) परतूर – बबनराव लोणीकर

41) बदनापूर (अजा) – नारायण कुचे

42) भोकरदन – संतोष दानवे

43) फुलंब्री – अनुराधा चव्हाण

44) औरंगाबाद पूर्व – अतुल सावे

45) गंगापूर – प्रशांत बंब

46) बागलान (अजजा) – दिलीप बोरसे

47) चंदवड – डॉ. राहुल अहेर

48) नाशिक पूर्व – अॅड. राहुल ढिकाले

49) नाशिक पश्चिम – सीमा हिरे

50) नालासोपारा – राजन नाईक

51) भिवंडी पश्चिम – महेश चौघुले

52) मुरबाड – किसन कथोरे

53) कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड

54) डोंबिवली – रवींद्र चव्हाण

55) ठाणे – संजय केळकर

56) ऐरोली – गणेश नाईक

57) बेलापूर – मंदा म्हात्रे

58) दहिसर – मनिषा चौधरी

59) मुलुंड – मिहिर कोटेचा

60) कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर

61) चारकोप – योगेश सागर

62) मलाड पश्चिम – विनोद शेलार

63) गोरेगाव – विद्या ठाकूर

64) अंधेरी पश्चिम – अमित साटम

65) विले पार्ले – पराग अळवणी

66) घाटकोपर पश्चिम – राम कदम

67) वांद्रे पश्चिम – अॅड. आशिष शेलार

68) सायन कोळीवाडा – आर. तमिल सेल्वन

69) वडाळा – कालिदास कोळंबकर

70) मलबार हिल – मंगलप्रभात लोढा

71) कोलाबा – अ‍ॅड. राहुल नार्वेकर

72) पनवेल – प्रशांत ठाकूर

73) उरण – महेश बाल्दी

74) दौंड – अ‍ॅड. राहुल कुल

75) चिंचवड – शंकर जगताप

76) भोसरी – महेश लांगडे

77) शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे

78) कोथरूड – चंद्रकांत पाटील

79) पार्वती – माधुरी मिसाळ

80) शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील

81) शेवगांव – मोनिका राजळे

82) राहुरी – शिवाजीराव कार्डिले

83) श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते

84) कर्जत जामखेड – राम शिंदे

85) केज (अजा) – नमिता मुंदडा

86) निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर

87) औसा – अभिमन्यू पवार

88) तुळजापूर – राणा जगजीतसिंह पाटील

89) सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख

90) अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी

91) सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख

92) माण – जयकुमार गोरे

93) कराड दक्षिण – अतुल भोसले

94) सातारा – शिवेंद्रराजे भोसले

95) कणकवली – नितेश राणे

96) कोल्हापूर दक्षिण – अमोल महाडिक

97) इचलकरंजी – राहुल आवाडे

98) मिरज – सुरेश खाडे

99) सांगली – सुधीर गाडगीळ

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img