महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटप कोणत्याही क्षणी जाहीर (Maharashtra Elections) होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. महाविकास आघाडीत इनकमिंग वाढलं आहेत. त्याचा फटका महायुतीतील पक्षांना बसत आहे. आताही अजित पवारांना पुण्यातून धक्का देणारी बातमी आली आहे. हडपसरमधील पाच नगरसेवक लवकरच अजितदादांची साथ सोडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आनंद अलकुंटे अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे लवकरच पक्ष सोडू शकतात अशी चर्चा आहे.
आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी अलकुंटे यांनी केली आहे. अजित पवार गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने अलकुंटे आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळाली आहे. या मतदारसंघात चेतन तुपे आमदार आहेत. आता अजित पवार यांच्याच पक्षातून बंडखोरीची चिन्हे दिसत असल्याने महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत. या राजकीय घडामोडी आगामी काळात महत्वाच्या ठरणार आहेत.
आनंद अलकुंटे माजी नगरसेवक आहेत. पुणे महापालिका नगरसेवक म्हणून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. पीएमपीएल चे माजी संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. हडपसरमधून अजित पवार समर्थक माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार यांच्यासह अजून दोन नगरसेवक साथ सोडणार आहेत अशी माहिती आहे. यासाठी मंगळवारी मोठं शक्तिप्रदर्शन करण्याची तयारीही झाली आहे. याच दिवशी आनंद अलकुटे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही ? हे मंत्री म्हणाले…
Ajit Pawar अजितदादांना बंडखोरांची धास्ती
राज्यात आगामी निवडणुका महायुती (Mahayuti Seat Sharing) एकत्रित लढणार असल्याचे नेते सांगत आहेत. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर घडामोडी घडताना दिसत आहे. जमिनीवर मात्र तशी परिस्थिती दिसत नाही. अजित पवार महायुतीत आल्याने अनेक इच्छुकांची अडचण झाली आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांनी महाविकास आघाडीची वाट धरली आहे. त्यातही शरद पवार गटाकडे इच्छुकांचा ओढा वाढला आहे. स्थानिक पातळीवरही बंडखोरीची भाषा वाढू लागली आहे. भाजपाच्या नेत्यांना अजित पवार गटावर नाराजी व्यक्त करत स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. याचा प्रत्यय जुन्नरमध्येही दिसला.
जुन्नरमधील भाजप नेत्या आशा बुचके निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. निवडणुकीआधीच राज्यात काही ठिकाणी महायुतीत अशी धुसफूस सुरू झाली आहे. आता या नाराजांना महायुतीचे नेते कशा पद्धतीने समजावून सांगतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.