8.2 C
New York

BJP : विदर्भातील भाजपाचे 23 शिलेदार ठरले; बावनकुळेंसह आणखी कुणाला संधी?

Published:

भाजपकडून (BJP ) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने 99 जागांसाठी उमेदवार जाहीर केले. या यादीत विदर्भातून 23 जणांना उमेदवारी देण्यात आली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातून तर कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली.

99 उमेदवारांच्या या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत विदर्भातून देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, श्वेता महाले, आकाश फुंडकर यांना उमेदवारी देण्यात आली. या 99 उमेदवारांपैकी 6 एसटी आणि 4 एससी उमेदवार आहेत.

BJP विदर्भातील भाजप उमेदवारांची यादी…

  1. नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
  2. कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
  3. चिखली -श्वेता महाले
  4. खामगाव – आकाश फुंडकर
  5. जळगाव (जामोद) – संजय कुटे
  6. अकोला पूर्व – रणधीर सावरकर
  7. धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
  8. अचलपूर – प्रवीण तायडे
  9. देवली – राजेश बकाने
  10. हिंगणघाट – समीर कुणावार
  11. वर्धा – पंकज भोयर
  12. हिंगना – समीर मेघे
  13. नागपूर दक्षिण – मोहन माते
  14. नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
  15. तिरोरा – विजय रहांगडाले
  16. गोंदिया – विनोद अग्रवाल
  17. अमगांव – संजय पुरम
  18. आर्मोली – कृष्णा गजबे
  19. बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
  20. चिमूर – बंटी भांगडिया
  21. वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
  22. रालेगाव – अशोक उडके
  23. यवतमाळ – मदन येरवर

महायुतीचं जागावाटप फायनल; भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

BJP महिला उमेदवार 13

श्वेता महाले, मोनिका राजळे, जया चव्हाण, मेघना बोर्डीकर, मंदा म्हात्रे यांच्यासह १३ महिलांना संधी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img