राज्यातून मान्सूनने पूर्ण माघार घेतली असली तर काही ठिकाणी अजूनही (Maharashtra Rain) पाऊस सुरुच आहे. आणखी काही दिवस पावसाचा मु्क्काम राहिल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज शनिवार आणि रविवारसाठी मुंबईला पावसाचा (Mumbai Rains) यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाणे, पालघर, दक्षिण कोकण भागालाही यलो अलर्ट आहे.
राज्यात सर्वदूर पाऊस झाला असला तरी आतापर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या चार टक्के कमी पाऊस (Heavy Rain) नोंदला गेला आहे. यामध्ये धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदूरबार, पुणे, नाशिक या जिल्ह्यांत मात्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. सध्या दक्षिण आंध्र प्रदेशपासून कर्नाटक, रायलसीमा या भागात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात चक्रीय वात स्थिती तयार झाली आहे. या दोन परिस्थितींमुळे कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतही काल सायंकाळी उशिरा मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवार आणि रविवारी मंबईत ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल. तसेच ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत मध्यरात्री खलबतं, जागावाटपाचा तिढा सुटला?
याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव विदर्भातील वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे ऑक्टोबर महिन्यात तापमान कमी होताना दिसत आहे. आता आणखी दोन दिवस राज्यात पावसाची स्थिती दिसून येणार आहे. यानंतर हवामानात बदल होण्याची शक्यता राहिल.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला होता. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली होती. जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला होता. जुलैनंतरही पुढील काही महिन्यांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे यंदा राज्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले आहे.