12.7 C
New York

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात सुरक्षा रक्षक पोलिसाला केलं निलंबित

Published:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. आता या प्रकरणात पोलीस सुरक्षा रक्षकाची चूक आढळून आल्याने त्याला निलंबित करण्यात आलं आहे.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये बाबा सिद्दिकी यांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कॉन्स्टेबलकडून चूक झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे कॉन्स्टेबल शाम सोनवणे यांना निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी जाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी बाब सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला होता, असा दावा निलंबित कॉन्स्टेबल सोनावणे यांनी केला. बाबा सिद्दिकी यांना दिवसा दोन तर रात्री एका कॉन्स्टेबलची सुरक्षा देण्यात आली होती.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह तुफान बरसणार

ज्यावेळी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी काऊंटर फायरिंग का केलं नाही असं विचारलं असता त्यावेळी दृष्यमानतेमुळे काही करता आलं नाही असं कारण यावेळी सुरक्षारक्षक कॉन्स्टेबलने दिलं आहे. त्यानंतर ही यांची चूक आहे अस ग्राह्य धरत अंगरक्षकावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img