12.7 C
New York

Mahayuti : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीचं वार वाहतं आहे. पण अद्यापपर्यंत दोनही आघाड्यांचं जागावाटप जाहीर झालेलं नाही. दिल्लीत अशातच आता काल रात्री उशिरा राजधानी बैठक पार पडली. (Mahayuti) राज्यातील निवडणूक आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला या बैठकीत यावर चर्चा झाली. यात भाजपच सर्वाधिक जागा लढणार असल्याची माहिती आहे. 155 ते 160 जागा भाजप लढण्याची शक्यता आहे. 75 ते 80 जागा शिवसेना शिंदे गटा लढेल. तर 55 ते 60 जागा राष्ट्रवादी अजित पवार गट लढणार असल्याची माहिती आहे.

Mahayuti अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

राजकीय वर्तुळात भाजप 142, शिंदे गट 66 आणि अजित पवार गट 52 जागा लढणार असल्याचीही चर्चा होत आहे. काल रात्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या सोबतच्या बैठकीनंतर या दौऱ्या वेळी अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जागावाटप फॉर्म भरण्याच्या आत केलं जाईल. आम्ही तिघे एकत्रित प्रेस घेऊ कुणाकुणाला किती जागा मिळाल्या आहेत ते स्पष्ट करू. महायुतीच्या जागावाटपामध्ये काहीही अडचण नाहीये, असं अजित पवार म्हणाले.

महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत मध्यरात्री खलबतं, जागावाटपाचा तिढा सुटला?

Mahayuti अमित शाह यांनी काय सूचना दिल्या?

महायुतीची काल रात्री दिल्लीत बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत या बैठकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी चर्चा केली. जागावाटपाच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. काही जागांवर महायुतीत अद्यापही तिढा कायम आहे. मात्र आता राज्य पातळीवर हा तिढा सोडवा अशा सूचना एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीनही नेत्यांना अमित शाह यांनी दिल्या आहेत.

Mahayuti मविआच्या जागावाटपाचं काय?

राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. विदर्भातील जागांवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आज शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार होती. मात्र काँग्रेस आणि ठाकरे गटातील वादामुळे ही यादी लांबणीवर पडली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img