12.9 C
New York

Mumbai News : या ” जन्मावर ” या ” मरणावर ” शतदा प्रेम करावे

Published:

मुंबई / रमेश औताडे

सर्वांना परिचित असलेले गाणे ” या जन्मावर …या जगण्यावर … शतदा प्रेम करावे ” संपूर्ण जीवनाचे सार सांगून जाते हे गाणे. मात्र अवयव दान केले तर ” या ” मरणावर ” शतदा प्रेम करावे असे आपल्या मृत्युनंतर जग बोलू लागेल. त्यासाठी अवयव दान चळवळ व्यापक करत ” अवयवदान सैनिकांचे ” जाळे निर्माण करण्याची गरज आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ ” द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ” या अवयव दान संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करेल असे मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले.

मुंबई मराठी पत्रकार संघ आणि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड डोनेशन मुंबई यांच्या वतीने अवयवदान आणि नेत्रदानाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.

१४० कोटीच्या देशात मागील वर्षी फक्त १०२० जणांनी केले अवयव दान केले. खेदाची बाब जरी असली तरी अजूनही कोट्यवधी जनतेला अवयव दान म्हणजे काय हेच माहिती नाही. यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे असे ” द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ” या अवयव दान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले.

विरोधकांना निडणुकीत धडा शिकवणार; अजित पवार त्र्यंबकेश्वरच्या सभेतून कडाडले

कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक कुमार कदम, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, संयुक्त कार्यवाह सुरेश वडवलकर, माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, अजय वैद्य, हेमंत सामंत,जगदीश भोवड, आदी पत्रकार उपस्थित होते.

फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड डोनेशन चे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, उपाध्यक्ष सुनील देशपांडे, प्रशांत पागनीस, नागराज अय्यर, श्रीकांत कुलकर्णी यांनी त्यावेळी अवयव दान संदर्भात मार्गदर्शन केले.
जेव्हा आपण अवयव दान करतो तेव्हा शरीर दान शक्य नसते आणि जेव्हा शरीर दान होते असे केल्याने शरीरातील अंतर्गत अवयवांचे दान करता येत नाही. मुळात शरीर दान आणि अवयवदान या दोन भिन्न गोष्टी आहेत. असे पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img