16.5 C
New York

ED : ईडीची ‘पीएफआय’संबंधित संस्थांवर ईडीची छापेमारी

Published:

पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संस्थेशी संबंधित ठिकाणांवर ईडीने (ED) छापेमारी केली. यामध्ये तब्बल 56.56 कोटी रुपयांच्या 35 मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. या संपत्ती त्यांच्या वेगवेगळ्या ट्रस्ट, फर्म आणि व्यक्तींच्या नावाने होत्या.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार 35.43 कोटी रुपयांच्या 19 मालमत्ता आणि 21.13 रुपयांची 16 मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. चौकशीमध्ये पीएफआयचे पदाधिकारी, सदस्य आणि केडर भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी फंडिग जमा करत होते.

हरियाणातला निर्णय पण, मेसेज महाराष्ट्र अन् झारखंडला; भाजपनं नेमकं काय केलं?

बँकिंग चॅनेल, हवाला, दान या माध्यमातून पीएफआयचे लोक निधी जमा करत होते. तब्बल 29 बॅंक खात्यांमध्ये अवैध पैसा जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे. भारतात आणि परदेशात अवैध पद्धतीने पीएफआय आणि इतरांकडून जमा करण्यात आलेल्या पैशांना कथितपणे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगना, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, जम्मू-काश्मीर आणि मणिपूर येथील 29 बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img