12.7 C
New York

Ajit Pawar : पारनेरमध्ये मोठी घडामोड! खा. लंकेंच्या मतदारसंघात अजितदादा; रणनिती काय ?

Published:

: राज्यात येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक आहे मात्र आता त्यापूर्वीच अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यातच नगर जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत व लक्ष लागून राहिलेल्या पारनेर मतदारसंघात कोण उमेदवार असणार याची उत्सुकता आहे. जागावाटप जाहीर होण्यापूर्वी आता राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचा बालेकिल्ला असलेल्या पारनेरमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दाखल होत आहेत. येथे त्यांची जाहीर सभाही होणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडत आहेत. या घडामोडींचं केंद्र पारनेर ठरत आहे. लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचं राजकारण अजितदादांना धक्का देणारं ठरलं होतं. अजित पवारांच्या गटातील निलेश लंकेंना पक्षात घेत थेट खासदार करण्याची किमया शरद पवारांनी साधली. अर्थात यात मतदारांचा वाटा मोठा राहिला. आता याच पराभवाची परतफेड करण्याचा इरादा अजितदादांनी पक्का केलाय. याची पहिली चुणूक पक्षातील इनकमिंगच्या माध्यमातून दिसली. पारनेरमधील विविध पक्षांतील नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सुजय विखेंचा थोरातांना खोचक टोला, म्हणाले…

माजी नगराध्यक्ष विजय औटी, शिवाजीराव गुजर, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर अजित पवार पहिल्यांदाच पारनेरमध्ये येत आहे. त्यामुळे येथील अजित पवार काय बोलणार याची उत्सुकता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याआधी पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होता. नंतर निलेश लंके अजित पवार गटात सहभागी झाले होते. नंतर लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी तुतारी हाती घेतली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून खासदारही झाले. या घडामोडी अजितदादांसाठी धक्कादायक ठरल्या होत्या. आता याचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढायचा असं त्यांनी ठरवल्याचं दिसतंय. यादृष्टीने त्यांचा आजचा पारनेर दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.

या मतदारसंघात जागावाटप अजून झालेलं नाही. तरी देखील ही जागा अजित पवार गटाला सुटेल अशी शक्यता आहे. अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष विजय औटी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे प्रमुख दावेदार आहेत. अशा परिस्थितीत अजित पवार पारनेरमध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. येथील सभेत अजित पवार काय बोलणार, उमेदवारीबाबत कुणाला बळ देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img