विधानसभा निवडणुकीचा नारळ फुटलेला आहे. आता राज्यातील सगळ्याच भागात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. (Ajit Pawar)अशातच अजित पवारांनीही राष्ट्रवादी पक्षाला नवी उभारी देण्यासाठी मैदानात उतरलेत. राष्ट्रवादी अजित पवार गटासंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. 41 उमेदवारांची यादी असून यामध्ये कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार? याबाबतची माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) संभाव्य उमेदवार यादी पुढीलप्रमाणे –
बारामती – अजित पवार
येवला- छगन भुजबळ
कागल- हसन मुश्रीफ
परळी- धनंजय मुंडे
दिंडोरी- नरहरी झिरवळ
अमळनेर – अनिल पाटील
तुमसर – राजू कारेमोरे
अर्जुनी मोरगाव – मनोहर चंद्रीकापुरे
अहेरी- धर्मारावबाबा आत्राम
पुसद- इंद्रनील नाईक
वसमत- चंद्रकांत नवघरे
कळवण- नितीन पवार
सिन्नर- माणिकराव कोकाटे
निफाड- दिलीप बनकर
देवळाली- सरोज अहिरे
शहापूर- दौलत दरोडा
श्रीवर्धन – अदिती तटकरे
उदगीर- संजय बनसोडे
जुन्नर- अतुल बेनके
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
पारनेरमध्ये मोठी घडामोड! खा. लंकेंच्या मतदारसंघात अजितदादा; रणनिती काय ?
खेड, आळंदी- दिलीप मोहिते
इंदापूर- दत्तात्रय भरणे
मोहोळ- यशवंत माने
मावळ- सुनील शेळके
वाई- मकरंद पाटील
चिपळूण- शेखर निकम
पिंपरी- अण्णा बनसोडे
वडगाव शेरी- सुनील टिंगरे
चंदगड- राजेश पाटील
हडपसर- चेतन तुपे
अकोले- किरण लहामटे
करमाळा- संजय शिंदे
मोर्शी- देवेंद्र भुयार
कोपरगाव- आशुतोष काळे
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
माजलगाव- जयसिंह सोळंके
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
अणुशक्तीनगर- सना मलिक
शिवाजीनगर मानखुर्द- नवाब मलिक
अमरावती शहर- सुलभा खोडके
इगतपुरी- हिरामण खोसकर
Ajit Pawar महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय?
राजधानी दिल्लीत महायुतीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या नेत्यांमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भाजप 155 जागा लढवणार आहे. शिवसेना शिंदे गट 78 जागा लढवणार आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 55 मिळणार असल्याचं बोललं जात आहे.