देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार अनेक (NDA Government) योजना राबवत आहे. देशातील (PM Kisan FPO Yojana)अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे सरकारचे नेहमीच लक्ष असते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. देशातील कोट्यवधी शेतकरी या सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. तर दुसरीकडे देशात आजही अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी आहे.
या शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल यासाठी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. या व्यतिरिक्त सरकार आणखी एक योजना शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. चला तर मग जाणून घेऊ या ही नेमकी कोणती योजना आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा..
NDA Government पीएम किसान एफपीओ योजना
शेतकऱ्यांना व्यावसायिक रूपाने बळकट करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे. या योजनेत सरकारकडून एकूण 11 शेतकऱ्यांच्या गटाला म्हणजेच फर्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला शेतीशी व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून सरकार कृषी क्षेत्राला आधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
जर एकाच शेतकऱ्याला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेत लाभ मिळणार नाही. यासाठी शेतकऱ्यांचा एक गट तयार करावा लागेल. या गटात कमीत कमी 11 शेतकरी असायला हवेत. ही अट पूर्ण केली तरच या योजनेचा लाभ घेता येईल.
NDA Government अर्ज कसा कराल
जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही एफपीओ तयार करण्यात सक्षम असाल तर या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी https://www.enam.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटच्या होम पेजवर नोंदणी करा. यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आवश्यक असलेली माहिती भरा. यानंतर अर्ज सबमिट करा. या योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला एफपीओचे एमडी, सीईओ किंवा मॅनेजरचे नाव, पत्ता, ई मेल आयडी आणि कॉन्टॅक्ट नंबर ही सर्व माहिती द्यावी लागेल.