8.5 C
New York

Salman Khan : सलमान खानला धमकावले, मुंबई पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Published:

अभिनेता सलमान खानसंदर्भात (Salman Khan) एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबई वाहतूक पोलिसांना (Mumbai Traffic Police) सलमान खानला धमकी मिळाली आहे. यामध्ये सलमान खानकडून 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Salman Khan धमकीच्या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय?

संदेश पाठवणाऱ्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हवाला देत म्हटलंय की, जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीशी असलेले वैर संपवायचे असेल तर त्याला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. हलक्यात घेण्याची चूक करू नका. जर त्यांनी पैसे दिले नाहीत तर त्यांची अवस्था बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा वाईट होईल, असं देखील मेसेजमध्ये म्हटलंय. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये अभिनेता सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. अभिनेता सलमान खान (Threat Message To Salman Khan) गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर आहे. या प्रकरणी अभिनेत्याने 4 जून रोजी मुंबई पोलिसांसमोर जबाबही नोंदवला आहे. वरळी पोलिसांनी व्हॉट्सअप धमकी प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत धमकी आणि खंडणीचा गुन्हा दाखल केलाय.

जुन्नरमध्ये महायुतीत तिढा! अजितदादांच्या आमदाराला भाजपाचं आव्हान?

Salman Khan सलमान खान रडारवर?

काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईने त्याच्या टोळीतील सदस्यांच्या मदतीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडवून आणली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपपत्रात दावा केला होता की, लॉरेन्सने सलमान खानला मारण्यासाठी 6 जणांना 20 लाख रुपये दिले होते. या टोळीने अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी घेतल्याचं देखील समोर आलं होतं. त्यानंतर

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरच्या रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाची जबाबदारी देखील बिश्नोई गॅंगने घेतली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत तीन शूटर्सनी बाबा सिद्दीकी यांची हत्या केली होती. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आलीय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img