12.7 C
New York

Ajit Pawar : जुन्नरमध्ये महायुतीत तिढा! अजितदादांच्या आमदाराला भाजपाचं आव्हान?

Published:

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्ष उमेदवारांची नावे फायनल करण्यात गुंतले आहेत. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारी याद्या जाहीर होतील असे सांगितले जात आहे. (Ajit Pawar) तर दुसरीकडे इच्छुकांकडूनही पत्ते उघडण्यास सुरुवात झाली आहे. यातच आता महायुती त्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं टेन्शन वाढविणारी बातमी धडकली आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा तिढा वाढला असून भाजपानेच अजितदादांसमोर आव्हान उभं केलं आहे.

भाजप नेत्या आशा बुचके निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अतुल बेनके शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी सुरू होत्या. मात्र बेनके यांनीच आज या चर्चांना पूर्णविराम दिला. आज सकाळी ओझरच्या विघ्नहर्ता गणपती मंदिरात त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी अतुल बेनके यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचे चिन्ह असलेला पंचा होता. त्यामुळे बेनके अजित पवार गटाकडूनच निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र दुसरीकडे या मतदारसंघात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपा नेत्या आशा बुचके निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. जर त्यांचा निर्धार कायम राहिला तर मतदारसंघात बंडखोरीची होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटासाठी ही स्थिती धोक्याची ठरू शकते. दरम्यान, आशा बुचके यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यानंतरही बुचके यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

महायुतीतील नेते जागावाटपाच्या अंतिम चर्चेसाठी दिल्लीत जाणार

Ajit Pawar मेळावा घेऊन करणार घोषणा

येत्या दोन दिवसांत मेळावा घेऊन घोषणा करण्याची शक्यता आहे. जुन्नरमधील राष्ट्रवादी आणि भाजपमधील संघर्षही कायम आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आयुष्यभर लढलो आता त्याच उमेदवाराचा प्रचार करायचा हे भाजप कार्यकर्त्यांना अजूनही पचनी पडलेलं नाही. त्यामुळेच भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्ष येथे सातत्याने उघड होत असतो.

अजित पवार यांचा ताफा जुन्नरमध्ये असताना अशा बुचके यांनी त्यांचा ताफा अडवत नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडेही दाखवले होते. त्यानंतर आता आशा बुचके या निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे जुन्नरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये नवा संघर्ष पेटला आहे. आशा बुचके यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते शरद सोनवणे हे देखील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार ठाम असल्याने महायुतीसमोर नवं टेन्शन उभा राहिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img