भाजपच्या टार्गेटवर कोण आहे हे आम्हाला माहिती आहे. आम्ही तुरुंगातून जाऊन आलो आहोत. भाजप बिश्नोई गॅंग असून त्यांच्याकडे हत्यार म्हणून ईडी, सीबीआय असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जागावाटपावरून संजय राऊत यांनी आज सुद्धा माहिती दिली.
Sanjay Raut on BJP त्याचं मी पालन करणार
संजय राऊत यांनी यावेळी बोलताना विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे कोणाचं स्वतंत्र संस्थान नसल्याचा खोचक टोलाही काँग्रेसला लगावला आहे. बऱ्याच जागांवर चर्चा पूर्ण झाली असून काही जागांची चर्चा बाकी आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी त्या संदर्भाने मी बोललो आहे. त्यांनीही काही सूचना दिल्या असून त्याचं मी पालन करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. बऱ्याच जागा संदर्भातील चर्चा पूर्ण झाली आहे. मात्र, काही जागांबाबत चर्चा अजूनही सुरू आहे. लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा सुटण्यासाठी मी आज राहुल गांधी यांच्याशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की मी काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी माझं बोलणं झालं असून महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबतही माझं बोलणं झालं आहे. त्यामुळे लवकरात लवकर जागावाटपाचा चर्चा पुढे सरकण्यासाठी बोलणी करणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
कोकणात भाजपला धक्का! माजी आमदार हाती बांधणार शिवबंधन
संजय राऊत यांच्या बोलण्यातून विदर्भातील काही जागांवर वाद असल्याचा स्पष्ट झालं आहे. ते म्हणाले की, आम्ही रामटेकसारखी सहा वेळा निवडून आलेली जागा काँग्रेसला दिली. अमरावतीचीही जागा आम्ही दिली. ज्या जागा आम्ही दिल्या त्या जागांवर त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकल्या सुद्धा आहेत. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. त्यामुळे विधानसभेला आम्हाला अधिक जागा मिळायला हव्यात हे समजून घ्यायला हवं, असंही राऊत यावेळी म्हणाले.
Sanjay Raut on BJP पक्षप्रवेश होणार
निवडणूक आयोगाच्या काही जाचक अटींविरोधात आम्ही त्यांना भेटणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट यांनी कंले. आज शिवसेना ठाकरे गटामध्ये कोकणातून दीपक साळुंखे आणि राजन तेली यांचा पक्षप्रवेश होत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आणखी काही महत्त्वाचे पक्षप्रवेश होणार असल्याचेही ते म्हणाले.