चित्रपटात अनेक दृश्यांमध्ये तुम्ही पाहिले असेल की, न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती. (New Justice Statue) एका हातात तराजू होता आणि एका हातात तलवार होती. जी बदलून आता हातात संविधान असेल. काही काळापूर्वी ब्रिटीश कायद्यात बदल करण्यात आले आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेनेही ब्रिटीशांचा काळ मागे टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने फक्त प्रतीकच बदलले नाही. तर न्यायदेवतेने वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टीही काढून टाकली आहे. तसेच आधी ज्या हाती तलवार होती त्या हाती संविधान दिसत आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये हा नवीन स्वरूपाचा पुतळा बसवण्यात आला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने हा पुतळा बसवण्यात आला असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वाचनालयातही असाच पुतळा बसवण्यात आला आहे. आधी न्यायदेवतेची मूर्ती असायची त्याच दोन्ही डोळ्यांवर पट्टी बांधली होती. तसेच, एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात तलवार होती. जी शिक्षेचे प्रतीक आहे.
गरीबी निर्मूलन दिवस का साजरा केला जातो? काय आहे महत्त्व?
New Justice Statue CJI ने हा निर्णय का घेतला?
आता CJI चंद्रचूड यांचा असा विश्वास होता की इंग्रजांचा वारसा सोडून पुढे गेले पाहिजे. कायदा कधीच आंधळा नसतो. तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे सरन्यायाधीशांचे मत होते. देवीच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल. तलवार हे हिंसेचे प्रतीक आहे, असे सीजेआय यांचे मत होते. तर, न्यायालये हिंसाचाराद्वारे न्याय देत नाहीत तर घटनात्मक कायद्यांनुसार न्याय देतात. त्यामुळे दुसऱ्या हातात तलवार ऐवजी संविधान असावे जो प्रत्येकाला समान न्याय देतो.
New Justice Statue न्यायदेवतेच्या नव्या पुतळ्यात काय विशेष आहे?
संपूर्ण पुतळ्याचा रंग पांढरा आहे
पुतळ्यामध्ये न्यायदेवतेचे भारतीय पोशाखात चित्रण करण्यात आले आहे. न्यायदेवता साडीत दाखवली आहे.
डोक्यावर एक सुंदर मुकुट देखील आहे.
कपाळावर बिंदी, कानात आणि गळ्यात पारंपरिक दागिनेही दिसतात.
न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आहे.
दुसऱ्या हातात संविधान धरलेले दाखवले आहे.
खरे तर न्यायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या न्यायालयांमध्ये ठेवलेल्या पुतळ्याला ‘लेडी जस्टिस’ म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी होती. आता ती हटवण्यात आली आहे.