7.5 C
New York

Vidhansabha Election : भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होणार

Published:

राज्यात विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसंच 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी ताकदीने मैदानात उतरली आहे. अशातच आता भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीबाबत अपडेट समोर येत आहे. पहिली यादी भाजपकडून उमेदवारांची उद्या जाहीर होणार आहे. महायुतीतल्या काही उमेदवारांना येत्या 48 तासात एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपकडून जाहीर करण्यात येणाऱ्या या पहिल्या यादीत कुणाची वर्णी लागणार? हे पाहावं लागणार आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी संघाकडूनही काही नावांची आग्रही मागणी आहे. एकाच मतदारसंघातून संघ आणि भाजप पक्षाकडून वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावांसाठी आग्रह आहे. महाराष्ट्रात भाजप पक्ष संघटनेकडून केंद्रीय नेतृत्वाकडे विविध नेत्यांच्या उमेदवारीसाठी यादी पाठवण्यात आली आहे. संघ विचार परिवाराकडे तर दुसऱ्या बाजूला काही इच्छुक उमेदवारांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे आता भाजपच्या यादीत हा समन्वय कसा साधला जाणार?, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मविआच्या जागा वाटपाबाबत शरद पवार म्हणाले…

डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचा प्रयत्न आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आग्रह आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुलुंडमध्ये मनोज कोटक यांच्यासाठी आग्रह आहे. तर भाजप मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यासाठी इच्छुक आहे. मंदा म्हात्रे यांना नवी मुंबईतून उमेदवारी देण्यात यावी, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटतं. तर संदीप नाईक यांच्यासा ठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. ठाण्यातून विनय सहस्रबुद्धे यांनाच उमेदवारी देण्यात यावी, असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह आहे. मात्र संजय केळकर यांना भाजप उमेदवारी देऊ इच्छित आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img