15.5 C
New York

Sharad Pawar : मविआच्या जागा वाटपाबाबत शरद पवार म्हणाले…

Published:

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती जागावाटपामध्ये कोणाच्या वाटेला किती जागा येतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (Sharad Pawar) लवकरच महायुतीतील जागावाटप जाहीर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर महाविकास आघाडीमधील जागावाटप जवळपास पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पण याबाबतच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मविआत केवळ 88 जागांची चर्चा होणे बाकी असल्याचे सांगत मविआच्या फॉर्म्युलाबाबत सूचक विधान केले आहे.

साताऱ्यातील कराड येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. सुरुवातीला पवारांना मविआतील जागावाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीत 288 पैकी 200 जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांसाठी आज बैठक होईल. बैठकीला तिन्ही पक्षांचे अध्यक्ष हजर राहतील, या बैठकीत ते निर्णय घेतील आणि त्यानंतर याबाबत आम्हाला सांगितले जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. यावेळी त्यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत म्हटले की, त्यांनी नवीन दिशा दिली आहे. हा विचार या देशात झाला नव्हता तो त्यांनी केला, असे म्हणत शरद पवारांनी चंद्रचूड यांच्या निर्णयाचे कौतुक केले.

वंचितकडून तिसरी यादी जाहीर, 30 उमेदवारांच्या नावांची घोषणा

तर महाविकास आघाडीमधून काँग्रेसने किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मविआत जागावाटपाबाबत नेमका काय फॉर्म्युला ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण राष्ट्रवादीतून विधानसभेच्या जागांसाठीचा संपूर्ण निर्णय हे जयंत पाटील घेतील, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, कारण ते पक्षाचे अध्यक्ष आहेत, असे म्हणत पवारांनी फॉर्म्युलाबाबत काहीही सांगण्यास नकार दिला आहे. परंतु, जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबजारी दिली जाईल, असे पवारांनी म्हटल्यामुळे त्यांच्यावरच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय पवारांनी घेतला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणाला बहुमत मिळते, हे पाहूनच मुख्यमंत्रीपदाबाबत बोलणे योग्य राहील, असे शरद पवारांनी सांगितले आहे. तर, आमच्या तिघांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा विषय संपला असल्याचेही शरद पवारांनी स्पष्ट केले.

यावेळी शरद पवार यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केले. हरियाणातील पराभवानंतर इंडिया आघाडीच्या नितीमध्ये काही बदल होणार का? असे पवारांना विचारले असता ते म्हणाले की, हरियाणात त्यांचे (भाजपाचे) सरकार आहे, ते कायम झाले. यापेक्षा दुसरं काही नाही. हरियाणाच्या निकालाचा आम्ही अभ्यास करत आहोत. पण जम्मू-काश्मीर सारख्या निवडणुकीवर जगाच लक्ष होतं. त्या पार्श्वभूमीवर तो निकाल देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, असे शरद पवार म्हणाले. तर, माढ्याचे आमदार बबनदादा भेटणार आहेत, दोनवेळा भेट झाली याबद्दल पत्रकारांनी विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, भेटायला कोणी आले तर काय करणार. राजकारणामुळे व्यक्तीगत सलोखा संपत नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img