12.9 C
New York

Mumbai News : ज्येष्ठांच्या आनंदासाठी ” सकारात्मक विचार ” हेच औषध

Published:

मुंबई / रमेश औताडे

ज्येष्ठ नागरिकांनी सतत सकारात्मक विचार करून आनंदी राहावं व बदलत्या काळात स्वतः बदल करून घ्यावा. (Mumbai News) ज्येष्ठांच्या आनंदासाठी ” सकारात्मक विचार ” हेच औषध आहे. जर काही समस्या असतील तर ” मातापिता आणि ज्येष्ठ नागरिक कायदा ” याचा आधार घेऊन आमची मदत तुमच्या सोबत २४ तास उपलब्ध आहे. असा विश्वास आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ नागरिक समस्या अभ्यासक प्रकाश नारायण बोरगांवकर ज्येष्ठांना दिला.

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त बोरगावकर बोलत होते. ज्येष्ठांच्या संपत्तीचे आणि जिविताचे रक्षण करण्यासाठी हा कायदा प्रभावी असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठांना तीर्थयात्रा योजना आणि वयोश्री योजने बरोबर अनेक योजना आहेत. त्यांचे आरोग्य व घरातील वारस हक्क वाद सोडविण्यासाठी आमची संस्था सदैव सहकार्य करत आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाने समुपदेशक कक्ष सुरू करून ज्येष्ठांच्या समस्या सोडवल्यास ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणातील खटले कमी होऊन त्यांचा ताण कमी होईल असे कायदे विषयक सल्लागार ॲड प्रमोद ढोकळे यांनी सांगितले.

मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघ समिती आणि
समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठांचा आनंद मेळावा साजरा केला गेला. ” आजी केअर सेवक फाउंडेशन ” चे सी.ई.ओ. प्रकाश नारायण बोरगांवकर हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. समाधान इंगळे, प्रकाश दिघे, रवींद्र दळवी, डॉ. प्रा.अशोक पाटील, शुभांगी बावडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img