9.5 C
New York

Otur police : दुधाच्या पिकअपमध्ये चक्क अवैध दारूची वाहतुक

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.१७ ऑक्टोबर  ( रमेश तांबे )

विधानसभा निवडणकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर, त्या अनुषंगाने ओतूर पोलीस स्टेशन (Otur police) हद्दीत कल्याण- अहमदनगर महामार्गावर ओतूर पोलिसांनी खुबी ( ता.जुन्नर ) या ठिकाणी केलेल्या नाकबंदी दरम्यान एका पिकअप वाहनाच्या आत ट्यूब मध्ये अवैध गावठी हातभट्टीची दारू मिळून आली.ओतूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पिकअप वाहनासह ४ लाख ६० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.

ओतूर पोलीसांनी पिकअप चालक दत्तात्रय शिवाजी काळे, वय ५० वर्षे, राहणार- पिंपळवंडी, ता.जुन्नर,जि.पुणे, यशवंत गुना रढे व रमेश पुनाजी कारभळ, दोघे राहणार- सावरणे ता. मुरबाड,जि.ठाणे, सुभाष बाबुराव नवले, राहणार पारगाव, ता.जुन्नर, जिल्हा पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना, ताब्यात घेतले आहे.

याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप  भोते यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

CM पदासाठी जयंत पाटलांचे नाव पुढे येताच मुंडेंचा टोला

याबाबत याबाबत अधिक माहिती देताना ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी थाटे म्हणाले की, नगर कल्याण महामार्गावर बुधवार दि.१६ रोजी नाकाबंदी चालू असताना सकाळी १० वाजता कल्याण बाजू कडून अहमदनगर कडे जाणाऱ्या दूध वाहतुकीचे पॅक बॉडी असलेली पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी क्रमांक एम.एच.१४ एच. यू. ८७६४  हे वाहन थांबून, हे वाहन संशयित वाटल्याने सदरची गाडी ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप भोते, सुभाष केदारी व इतर सहकारी यांनी तपासणी केली असता,सदर गाडीमध्ये ट्यूब मध्ये गावठी हातभट्टी दारू मिळून आली. सदर वेळी सदर पिक अप गाडी चालकाचे नाव  दत्तात्रय शिवाजी काळे, वय ५० वर्षे, राहणार- पिंपळवंडी, ता. जुन्नर, जि. पुणे असे सांगीतले. तसेच सदरची गावठी हातभट्टीची दारू तो यशवंत गुना रढे व रमेश पुनाजी कारभळ, दोघेही राहणार- सावरणे ता. मुरबाड, जिल्हा ठाणे यांच्याकडून घेऊन आला असून इसम नामे सुभाष बाबुराव नवले, राहणार पारगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांच्याकडे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. 

वरिल चारही आरोपींना ओतूर पोलीसांनी ताब्यात घेतले असून आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, कलम कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स पो नि लहू थाटे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस अंमलदार संदीप भोते, सुभाष केदारी, श्याम जायभाये, पो.हवा. बाळशीराम भवारी, सुरेश गेंगजे, यांनी केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार बाळशिराम भवारी हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img