प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तानचा (INDvsPAK) सामना पाहायचा असतो मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देश फक्त आयसीसी (ICC) किंवा एसीसी (ACC) स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. पण आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान एकमेकांसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्याची शक्यता आहे.
राजकीय कारणांमुळे दोन्ही देश एकमेकांसोबत द्विपक्षीय मालिका खेळात नाही. दोन्ही देशांनी शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळली होती मात्र आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान एकमेकांसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, भारताकडून दोन्ही देशांमध्ये क्रिकेट पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही देशात पुन्हा एकदा द्विपक्षीय मालिका होण्याची शक्यता वाढली आहे. तर दुसरीकडे याबाबत पीसीबी (PCB) किंवा बीसीसीआयकडून (BCCI) या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही तसेच दोन्ही देशाच्या सरकारांनी देखील याबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
पवार कुठलेही संकेत देत नाहीत; राऊतांनी एका वाक्यात सर्व चर्चा ठरवल्या फोल!
जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) मध्ये भाग घेण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यात दोन्ही देशांनी क्रिकेटवर चर्चा करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात याबाबत अधिकृत चर्चा देखील होऊ शकते. मात्र पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी भारताने आतापर्यंत होकार दिलेला नाही. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तानबाहेर आयोजित करण्यात येऊ शकते किंवा हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा आयोजित करण्यात येऊ शकते अशी माहिती जिओ न्यूजने दिली आहे.
2012-13 मध्ये भारत आणि पाकिस्तानने शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली होती त्यानंतर दोन्ही देश फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळत आहे. भारतीय संघाने द्विपक्षीय मालिकेसाठी 2006 शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता तर 2008 मध्ये भारतीय संघ आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानला गेला होता तर 2023 च्या विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता.