15.5 C
New York

Otur : पिंपरी पेंढार आणि डुंबरवाडीत दोन बिबटे जेरबंद 

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.१६ ऑक्टोबर ( रमेश तांबे )

जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील पिरपट परिसरात बुधवारी दि.९ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने (Otur) हल्ला केल्याने येथील ४२ वर्षाच्या महिलेवर दि.९ बिबट्याने हल्ला केल्याने या महिलेचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली होती.या घटनेनंतर वन विभागाने या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये शुक्रवारी दि.११ रोजी एक पाच वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी मंगळवारी दि.१५ रोजी रात्री पाच ते सहा वर्ष वयाचा दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात आला.तसेच डुंबरवाडी येथील गणेशनगर येथे बुधवारी पहाटे दोन ते अडीच वर्षाचा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.

डुंबरवाडी येथील गणेशनगर येथे बुधवारी पहाटे बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरच्या  वनपाल एस.एम.बुट्टे,वनरक्षक व्ही.ए.बेले,वनकर्मचारी गणपत केदार,किसन केदार, फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव आदी कर्मचारी घटनास्थळी जाऊन,पिजऱ्यासह बिबट्याला ताब्यात घेतले.तसेच वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरीक नितीन डुंबरे , देवराम डुंबरे,बन्सिधर हाडवळे ,दत्तात्रय हाडवळे व  इतर ग्रामस्थांच्या सहकार्याने माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल केले.
     सदर बिबट हा नर जातीचा असून अंदाजे दोन ते अडीच वर्ष वयाचा असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्राकडून देण्यात आली आहे.

दरम्यान दि.९ रोजी पिरपट येथे पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने सुजाता रवींद्र डेरे या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सदरची घटना घडल्यानंतर जुन्नर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी २८ पिंजरे लावले आहेत. तसेच ११ ट्रॅप कॅमेरे लावले असून थर्मल ड्रोन च्या साह्याने शोधकार्य सुरू असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img