3.6 C
New York

Vidhansabha Election : निवडणुकीचा बिगुल वाजला, अजितदादा गटाची 37 उमेदवारांची यादी तयार

Published:

विधानसभेची (Vidhansabha Election) आचारसंहिता जाहीर झाली, मतदानाची तारीखही निश्चित झाली. मात्र महायुती व महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार अद्याप ठरले नाहीत. मात्र, ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे, ती जागा त्याच पक्षाला सुटणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीने उमेदवारांची पहिली यादी तयार केल्याचे बोललं जातंय. त्यात नगर जिल्ह्यातील चार जागांसह 37 जागांचा समावेश आहे.

नगर जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदार असलेले मतदारसंघ आणि पारनेरची जागाही अजितदादा गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बारापैकी चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर नगर शहरातील आमदार संग्राम जगताप, अकोल्याचे डॉ. किरण लहमटे, कोपरगावचे आशुतोष काळे आणि पारनेरचे निलेश लंके हे अजितदादांसोबत गेले होते. मात्र, लोकसभेच्या तोंडावर लंकेंनी घरवापसी करत शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा लढवली आणि ते विजयी झाले. तेव्हापासून पारनेरची जागा रिक्त आहे.

महायुती सरकारचा सामान्य वर्गाला मोठा झटका

दरम्यान, जेथे ज्यांचा आमदार आहेत, ती जागा त्यांनाच सुटेल असं जर महायुतीचे सुत्र ठरलं तर नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप, आशुतोष काळे आणि किरण लहमटे यांची उमेदवारी निश्चित आहे. तर पारनेरची जागा अजितदादांना गटाला सुटल्यास तेथे विजय औटी, सुजित झावरे किंवा काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

Vidhansabha Election नगर जिल्ह्यात 12 जागा

नगर जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत. तिथे त्यांचाच दावा राहिलं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाची नगरमध्ये एकही जागा नाही. त्यामुळं त्यांना कोणती जागा दिली जाते की, मिळणारच नाही? याकडेही लक्ष लागलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img