15.5 C
New York

Amit Shah : शिंदेंजी आम्ही तुमच्यासाठी त्याग केला, अमित शाहांचे मोठे विधान

Published:

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील पक्षांकडून याच पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता महायुतीची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. सकाळी ११ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहे. यात महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्देशून एक महत्त्वाचे विधान केले आहे.

Amit Shah राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मुख्यमंत्रि‍पदावरुन राजकारण सुरु आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या महाराष्ट्रातील नेत्यांसोबत महत्त्वाच्या बैठका पार पडत आहेत. यातील एका बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून महत्वाचे विधान केले आहे. आम्ही त्याग मुख्यमंत्रीपदावेळी केला, आता तुम्ही झुकते माप घ्या, असा सल्ला एकनाथ शिंदेना अमित शाह यांनी दिला. राजकीय वर्तुळात सध्या या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे.

शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटलांचा मुश्रीफांवर वार

Amit Shah “तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला”

“शिंदेजी देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि तहसीलदार अशी काही महत्त्वाची पदे आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहेत. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला, असे विधान अमित शाह यांनी एका बैठकीदरम्यान केले. सूत्रांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागावाटपात अमित शाह यांच्या या विधानामुळे तडजोड करावी लागणार का? अशी चर्चा सध्या रंगत आहे. तसचे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद दिले जाणार की कोणी दुसरा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी असणार, असे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.

Amit Shah महायुतीचा फॉर्म्युला काय?

भाजप 150-160 जागा दरम्यान येत्या विधानसभा निवडणुकीत लढवणार असल्याचे बोललं जात आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 70 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच 50 जागा मिळण्याची शक्यता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतेही शिक्कामोर्तब झालेले नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img