काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Elections 2024) घोषणाकेंद्रीय निवडणूक आयोगाने केली. या घोषणेनंतर राज्याचं राजकीय चित्र वेगाने बदलू लागलं आहे. महायुती एकत्रितपणे निवडणुका लढणार असल्याचे वरवर सांगितले जात असले तरी अंतगर्त दबावाचं राजकारण सुरू आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर निवडणुकीनंतर मिळेलच पण, त्याआधीच या पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मुख्यमंत्रिपदासाठी भाजपने केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदे यांना आठवण करून दिली होती. त्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शिंदेंना त्याग करण्याचा सल्ला दिला आहे.
बावनकुळे म्हणाले मोठ्या मनाने त्याग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा असे आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले. आज भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्याआधीच बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात चर्चेचा बार उडाला आहे.
शिंदेंजी आम्ही तुमच्यासाठी त्याग केला, अमित शाहांचे मोठे विधान
Eknath Shinde काय म्हणाले बावनकुळे ?
आजच्या बैठकीत भाजपाचे विद्यमान आमदारांचे मतदारसंघ आणि ज्या ठिकाणी आम्ही मजबूत आहोत मात्र थोड्या मतांना पराभूत झालो अशा जागांची चर्चा होणार आहे. या बैठकीत काही उमेदवारांची नावही अंतिम होतील. नंतरच्या उमेदवारांची नावं टप्प्याटप्प्याने निश्चित होतील. मात्र या बैठकीत सर्व उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.