मराठी चित्रपटसृष्टीसाठी (Marathi films) मोठी बातमी आहे. अखेर मराठी अभिनेते प्रसाद ओक ( Prasad Oak) यांच्या प्रयत्नांना यश मिळालंय. मराठी चित्रपटांना आता त्यांच्या हक्काचं अनुदान मिळणार आहे.महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक, शैक्षणिक कला आणि क्रीडा विश्वातील व्यक्तींच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट / मातहतीपट / लघुपट यांना सहाय्यक अनुदान मिळणार आहे. यंदाच्या वर्षापासून अडीच करोड (२.५० cr ) इतकी रक्कम मिळणार आहे.
अभिनेता – दिग्दर्शक प्रसाद ओक आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी हे अनुदान मिळण्यासाठी वारंवार मागोवा केला होता. मराठी चित्रपटांना योग्य अनुदान मिळावं म्हणून प्रसाद ओक (grant to marathi films) आणि महेश कोठारे यांनी कठोर प्रयत्न केले होते. त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून सात करोड रूपये रक्कम मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आजच्या नव्या माहिती नुसार महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी सिनेमांना तब्बल २.५० करोड रुपये अनुदान देण्यात यावं, यावर शिक्कमोर्तब केलाय.
बीसीसीआयने का रद्द केला इम्पॅक्ट प्लेअर? नियम अन् अटी काय? जाणून घ्या
प्रसाद ओक हे नेहमीच मराठी चित्रपटांना योग्य न्याय मिळावा, यासाठी वारंवार भाष्य करताना दिसले आहेत. आजची ही गोष्ट मराठी चित्रसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. प्रसाद ओक आधीपासून या कमिटीवर आहेत. मराठी इंडस्ट्रीसाठी काय वेगळं करता येईल? याकडे त्यांचा नेहमीच कल असतो.
प्रसाद ओक याबद्दल बोलताना म्हणाले की, गेली अनेक वर्ष मनोरंजनसृष्टीत काम केल्यानंतर अलीकडच्या वर्षात सिनेदिग्दर्शक वा आता निर्मिती सुरु केलीय. त्यानंतर सिनेनिर्मिती करताना आर्थिक बाजू अधिक जवळून अभ्यासता आली. सांस्कृतिक विभाकडून सिनेमांना मिळणारे तीस ते पन्नास लाख रूपयांचे मिळणारे अनुदान अपुरं असल्याचं निदर्शनास आलंय. आजचे सिनेमांचे निर्मिती मूल्य कोटी रुपयांच्या घरात आहे. यासंदर्भात आम्ही सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा केली होती.
महाराष्ट्र शासनाने हे नवं अनुदान देऊन मराठी चित्रपटांसाठी एक वेगळा स्टँड घेतलाय. यात महाराष्ट्र सरकारसह सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सक्रिय सहभागाने कलाकारांच्या मागण्या समजून घेण्यात आल्या. संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीसाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. प्रसाद ओक यांच्या या नव्या भूमिकेचं तोंड भरून कौतुक सध्या होतंय. ही गोष्ट केवळ मराठी चित्रपटांसाठी नाही तर संपूर्ण मराठी इंडस्ट्रीसाठी महत्वाची आहे.