मोदी सरकारने दिवाळीच्या सणाआधीच देशातील करोडो कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. (Modi Govermment) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी महागाई भत्ता (डीए) जारी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे, मात्र केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळताच देशातील सर्व राज्यांमध्येही महागाई भत्ता वाढीचा निर्णय जाहीर होणार आहे. डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यासोबतच कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकी देण्याची घोषणाही केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे.
केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढवते. या वर्षी म्हणजेच 2024 मध्येही जानेवारीत 4 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता, तर आज झालेल्या बैठकीत जुलैसाठी डीए वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.यामुळेच जुलैपासून महागाई भत्त्यातील ही तीन टक्के आहे. तसेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची थकबाकीही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
Modi Govermment असा वाढणार पगार
एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 40 हजार रुपये असेल आणि त्याच्या डीएमध्ये 3 टक्के वाढ होणार आहे. म्हणजे त्याच्या पगारात 1,200 रुपयांची वाढ होईल. म्हणजे मूळ वेतन, महागाई भत्ता आणि एचआरए जोडण्याआधी त्याचा पगार 60 हजार रुपये होता, तर आता तो 61,200 रुपये होईल.
अर्ज भरायला 6 अन् बंडखोराला थंड करण्यासाठी 4 दिवस
Modi Govermment किती रक्कम मिळणार
40 हजार रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला 3 टक्के डीए वाढ मिळणार आहे. म्हणजे दरमहा 1,200 रुपये अतिरिक्त महागाई भत्ता त्याला मिळणार आहे. ही वाढ जुलैपासूनच लागू मानली जात असल्याने कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे. या प्रकारे त्यांना थकबाकी म्हणून 3,600 रुपयेही मिळतील.
Modi Govermment ऑक्टोंबर महिन्यात किती मिळणार पगार
डीए वाढ जुलै महिन्यापासून लागू केली आहे. ऑक्टोंबर महिन्याचे मिळवल्यास चार महिन्यांचा डिओ मिळणार आहे. म्हणजे 40 हजार मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार 60 हजार रुपये होत होतो. परंतु ऑक्टोंबर महिन्यांत चार महिन्यांचा फरक मिळून हा पगार 4800 रुपये वाढणार आहे. म्हणजे 64,800 रुपये पगार ऑक्टोंबर महिन्यात येणार आहे.