12.9 C
New York

MSP Hike : शेतकऱ्यांनाही दिवाळीचा बोनस! रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभावात वाढ

Published:

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीचा बोनस देण्यात आलायं. रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभावात (MSP Hike) वाढ करण्याच्या निर्णय घेण्यात आलायं. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी घोषणा केलीयं. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळणार आहे.

यामध्ये गहूच्या हमीभावात 150 रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आलीयं. त्यामुळे आता प्रति क्विंटलचा भाव 2425 रुपये झालायं. मोहरीच्या हमीभावात 300 रुपयांनी वाढ करण्यात आली असून मोहरीचा हमीभाव आत 5950 रुपये प्रतिक्विंटल असणार आहे. तर हरभराच्या हमीभावात 210 रुपयांची वाढ करण्यात आली असून हरभरा 5650 रुपये प्रति क्विंटल हमीभाव करण्यात आला आहे. मसूरच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 275 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. करडईच्या एमएसपीमध्ये 140 रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे.

निवडणुकीचा बिगुल वाजला, अजितदादा गटाची 37 उमेदवारांची यादी तयार

रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पन्नाला आधार देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने केंद्र सरकारकडून रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलायं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img