भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची (Assembly Election ) घोषणा करण्यात आलीयं. आयोगाच्या घोषणेनुसार राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे 39 दिवसांत राज्यात निवडणुकीचा कार्यक्रम आजपासून बरोबर आटोपणार आहे. तर आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झालीय. एकूणच निवडणुकीचा कार्यक्रम पाहता , बंडखोरीला थंड करण्यासाठी 4 दिवस तर अर्ज भरण्यासाठी फक्त 6 दिवस असल्याचं दिसून येत आहे.
विधानसभेसाठी उमेदवारांना येत्या 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरता येणार आहे तर उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. त्यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तरआपला उमेदवारी अर्ज 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवार मागे घेऊ शकणार आहेत. 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 नोव्हेंबरला राज्यात कोणाच सरकार येईल? या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.
63 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार; पुरुष अन् महिला किती?
Assembly Election विधानसभा निवडणुकीचं शेड्यूल कसं असणार?
महाराष्ट्रात मंगळवारपासून (15 ऑक्टोबर) आचारसंहिता लागू.
20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल.
15 व्या विधानसभेचे आणि महाराष्ट्राचे नवीन कारभारी 23 नोव्हेंबरला ठरणार.
22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत
26 ऑक्टोबरला शनिवार तर 27 ऑक्टोबरला रविवार असल्यामुळे, 22 ते 25 आणि 28 ते 29 असे सहा दिवसच अर्ज भरण्यासाठी वेळ
उमेदवारांकडे अर्ज भरण्यासाठी आजपासून उरले अवघे 14 दिवस
छाननी 30 ऑक्टोबरला तर अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत, दिवाळीमुळे अर्ज मागे घेण्यासाठी जादा वेळ, एकूणच उमेदवारांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळणार आहे.
प्रचारासाठी जवळपास 18 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एक महिना मिळणार
आजपासून 39 दिवसांत महाराष्ट्राची निवडणूक आटोपणार
अर्जांची छाननी ते माघारीत 4 दिवसांचा वेळ
निवडणुकीत उमेदवाराने बंड केल्यास समजवण्यासाठी 4 दिवसांचा वेळ